Yami Gautam : चाहत्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’, जाणून घ्या कोण आहे ‘आदित्य धर’, ज्याच्याशी यामी गौतमने बांधली लग्नगाठ!

आदित्य धर यामी गौतम अभिनित ‘उरी’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. ('Surgical strike' on fans, find out who is 'Aditya Dhar', with whom Yami Gautam tied the knot!)

Yami Gautam : चाहत्यांवर 'सर्जिकल स्ट्राईक', जाणून घ्या कोण आहे 'आदित्य धर', ज्याच्याशी यामी गौतमने बांधली लग्नगाठ!
यामी गौतम
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 7:04 PM

मुंबई: चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देत अभिनेत्री यामी गौतमनं आपल्या लग्नाची बातमी सोशल मीडियावरून शेअर केली आहे. यामी चित्रपट दिग्दर्शक आदित्य धर याच्याशी विवाहबंधन अडकली आहे. आदित्य धर (Aditya Dhar) यामी गौतम अभिनित ‘उरी’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. या चित्रपटात अभिनेत्रीबरोबर विक्की कौशलदेखील मुख्य भूमिकेत दिसला होता (Yami Gautam wedding)

पाहा फोटो

View this post on Instagram

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

कोण आहे आदित्य धर ?

आदित्य एक उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार आहेत. 2008 पासून तो मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. काबुल एक्स्प्रेस, हाल-ए-दिल, वन टू थ्री आणि डॅडी कूल या चित्रपटासाठी त्यानं गाणी दिली आहेत. तर ‘आक्रोश’ आणि ‘तेज’ या दोन चित्रपटांसाठी त्यांनी संवादही लिहिले आहेत.

2016 मध्ये झालेल्या उरी हल्ल्यावर आधारित चित्रपट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शकीय पदार्पण केलं. या चित्रपटात विकी कौशल आणि यामी हे मुख्य भूमिकेत होते. 38 वर्षीय आदित्यनं 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही जिंकला.

आता तो ‘अमर अश्वत्थामा’ याचित्रपटात दिग्दर्शकाची भूमिका पार पाडणार असून या चित्रपटातसुद्धा विकी कौशलची भूमिका आहे. सारा अली खान सुद्धा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार अशी चर्चा आहे. आदित्यचा जन्म 12 मार्च 1983 रोजी भारतातील नवी दिल्ली येथे झाला होता.

पारंपारिक पद्धतीनं विवाह सोहळा

यामी आणि आदित्यनं पारंपारिक पद्दतीनं हे लग्न केलं. पारंपारिक पोशाखात दोघंही दिसले. यामीनं डोक्यावर दुप्पट्या घेत सुंदर मरुन साडी परिधान केली. सोबतच तिनं पारंपारिक सोन्याच्या दागिन्यांसह तिचा लुक कॅरी केला. दुसरीकडे आदित्यनं व्हाईट आणि गोल्डन शेरवानी कॅरी केली.

शुभेच्छांचा वर्षाव

यामी गौतम आणि आदित्य धर हे एकमेकांना ‘उरी’ या सिनेमापासून ओळखतात. आदित्य एक उत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. यामी गौतम आणि आदित्यच्या लग्नाच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अभिनेता वरुण धवनने सर्वात आधी हा फोटो लाईक केला होता.

संबंधित बातम्या

Yami Gautam | चाहत्यांवर सर्जिकल स्ट्राईक, अभिनेत्री यामी गौतमचं गुपचूप लग्न, उरीच्या दिग्दर्शकासोबत लगीनगाठ

Photo : मधुरा नाईकचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर; शेअर केले अ‍ॅनिमेटेड बिकिनी फोटो

‘5G’ प्रकरणात जुही चावलाला हायकोर्टाचा दणका, याचिका फेटाळत ठोठावला 20 लाखांचा दंड!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.