सुशांत आणि रियाच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल, पैशांच्या गुंतवणुकीबाबत चर्चा, बॉलिवूड सोडण्याबाबतही भाष्य

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Sushant Singh Rajput and Rhea Chakraborty Audio clip viral).

सुशांत आणि रियाच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल, पैशांच्या गुंतवणुकीबाबत चर्चा, बॉलिवूड सोडण्याबाबतही भाष्य
Follow us
| Updated on: Aug 29, 2020 | 8:02 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. मात्र, आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडियो क्लिपमध्ये सुशांत आणि रिया पैशांच्या गुंतवणुकीबाबत चर्चा करत आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये सुशांत ट्रस्ट स्थापन करण्याबाबत बोलत आहे. त्याचबरोबर तो आपल्या करिअर प्लॅनिंगबाबतही चर्चा करत आहे (Sushant Singh Rajput and Rhea Chakraborty Audio clip viral).

सुशांत आणि रियाच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप जवळपास 36 मिनिटांची आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये सुशांत आणि रियासोबत आणखी काही जणांचा आवाज ऐकू येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑडिओ क्लिपमध्ये रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि आर्थिक सल्लागारांचादेखील आवाज आहे.

या ऑडियो क्लिपमध्ये सुशांत बॉलिवूड सोडण्याविषयी बोलत आहे. सुशांत बॉलिवूडमधील निवृत्तीसह आपल्या आजाराबद्दलही बोलत आहे. त्यावर रिया आणि इंद्रजीत चक्रवर्तीदेखील आपलं मत मांडत आहेत (Sushant Singh Rajput and Rhea Chakraborty Audio clip viral).

सुशांतने पैशांची एफडी करावी, असा सल्ला ऑडिओ क्लिपमध्ये रिया सुशांतला देत असल्याचं समजत आहे. “समजा मी सुशांतसोबत नसली, श्रृती आणि मिरांडा हे दोघे त्याच्यासोबत नसले, कुणी तिसरी व्यक्ती सुशांतसोबत असेल, त्याच्या हातात जर सुशांतचं कार्ड पडलं तर? त्यामुळे सुशांतला मी सर्वात आधी सांगेन की, त्याने पैशांची एफडी बनवावी. आपण सुशांतचे सर्व पैसे एफडीच्या स्वरुपात सुरक्षित ठेवू. सुशांतच्या कार्डमध्ये 10 ते 15 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे ठेवायचे नाहीत. सुशांतला एफडीचे व्याज मिळत राहणार. याशिवाय त्याचे पैसेही सुरक्षित राहतील. सुशांतच्या स्वाक्षरीशिवाय ते काढता येणार नाहीत”, असं रिया ऑडियो क्लिपमध्ये म्हणत आहे.

ऑडियो क्लिपमध्ये आणखी काय संभाषण आहे?

सुशांत – मला आता या शहरातून बाहेर जायचं आहे.

रिया – सर्वात आधी आपण गोवा जाऊ. तिथे एक-दोन महिने थांबू. त्यानंतर आपण कुठं जायचं? हा निर्णय घेऊ.

सुशांत – मला कुठल्यातरी नैसर्गिक ठिकाणी जायचं आहे.

रिया – पावना! तिथे मनाला शांती मिळेल. आपण एक-दोन दिवस तिथेच थांबू. तिथं तुला कसं वाटतं ते पाहूया.

सुशांत – मी केवळ निवेदन करु इच्छितो. हे सर्व कसं संपवता येईल आणि आपले पैसे वाचतील. हा सर्वात कठीण काळ आहे, जो मी कधीच बघितला नाही.

इतर व्यक्तींचे आवाज – कठीण वेळेतच खासगी ट्रस्टची स्थापना केली जाते, जिथे व्यक्तीचे सर्व आर्थिक निर्णय ट्रस्टशी जोडले गेलेल्या सर्व व्यक्तींच्या सहकार्याने घेतले जातात.

संबंधित बातम्या :

‘सुशांतला ड्रग्ज का आणि कुणाच्या सांगण्यावरुन दिले?’ सीबीआयकडून रियावर प्रश्नांची सरबत्ती

मुंबईत आईस्क्रीम विक्री, मीडिया हाऊस ते चित्रपट निर्मिती, सुशांत प्रकरणाशी संदीप सिंहचा संबंध काय?

Rhea Chakraborty | सुशांतला मानसिक आजार, तो नेहमी मॅरिजुआना ड्रग्ज घ्यायचा – रिया चक्रवर्ती

CBI Inquiry | आठव्या दिवशी रियाचा सीबीआयशी सामना, चौकशीत नेमकं काय झालं?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.