Sushant Singh Rajput Case | ड्रग्ज तस्कर हेमल शाह NCBच्या ताब्यात, कोर्टासमोर हजर करणार, वाचा या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) मुंबईच्या पथकाने गोवा येथून ड्रग्स पेडलर हेमल शाह (Hemal Shah) याला अटक केली. आज (7 मे) त्याला न्यायालयात हजर केले जाईल. बॉलिवूड सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाच्या केसशी हेमल शाह याचे नाव संबंधित आहे.
मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) मुंबईच्या पथकाने गोवा येथून ड्रग्स पेडलर हेमल शाह (Hemal Shah) याला अटक केली. आज (7 मे) त्याला न्यायालयात हजर केले जाईल. बॉलिवूड सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाच्या केसशी हेमल शाह याचे नाव संबंधित आहे. यापूर्वीही एनसीबीने सुशांत प्रकरणाशी संबंधित अनेक ड्रग तस्करांना अटक केली आहे. हेमल शाहच्या अटकेनंतर सुशांत सिंहच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणात अनेक नवीन खुलासे होत आहेत (Sushant Singh Rajput Case NCB Arrest Drugs Peddler Hemal Shah).
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ड्रग प्रकरणात चित्रपटात क्षेत्रातील अनेक व्यक्तिरेखांची नावे समोर आली आहेत. यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने कठोर कारवाई करत अनेक ड्रग्ज पेडलर्सना कडक केली. ड्रग्स आणि बॉलिवूड यांच्यातील संबंध स्रोत शोधत एनसीबीने अनेक नामांकित सेलिब्रिटींचीही चौकशी केली आहे. दरम्यान, हेमल शाहला अटक करणे, हे एनसीबीचे मोठे यश मानले जात आहे.
ड्रग्ज पेडलर हेमल शाहला अटक :
Mumbai NCB arrested Hemal Shah, a drug peddler from Goa, in a drug case related to Sushant Singh Rajput’s death case.
He will be produced before court later today
— ANI (@ANI) May 7, 2021
सुशांतला जाऊन एक वर्ष पूर्ण होणार
गेल्या वर्षी जूनमध्ये सुशांत सिंह राजपूत यांचे निधन झाले होते. ड्रग ओव्हरडोज हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले गेले. तेव्हापासून एनसीबी बॉलिवूड आणि ड्रग्ज रॅकेटमधील संबंध शोधण्यात गुंतली होती. या प्रकरणात एनसीबीने न्यायालयात आपले दोषारोपपत्रही दाखल केले. या आरोपपत्रात एनसीबीने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि त्याचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह 33 जणांवर आरोप केले आहेत (Sushant Singh Rajput Case NCB Arrest Drugs Peddler Hemal Shah).
सुशांत प्रकरणात आतापर्यंत काय घडले आहे?
सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह 14 जून 2020 रोजी त्याच्या वांद्रे येथील घरात सापडला. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे वडील केके सिंह यांनी पटनामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला होता. त्यांनी रियावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. यानंतर, ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा खटला सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयच्या चौकशीत जेव्हा ड्रग्सचे कनेक्शन समोर आले, तेव्हा या प्रकरणात एनसीबीचादेखील या तपास सुरु झाला.
रिया, दीपिका, सारा, रकुलप्रीत यांच्यासह अनेक सेलेब्सची चौकशी
दरम्यान, या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिलाही अटक करण्यात आली आणि ती तब्बल एक महिना भायखळा तुरूंगात होती. मात्र, नंतर रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना जामीन मिळाला. सुशांत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांची आतापर्यंत चौकशी केली आहे. यात दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंग अशा अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली होती.
(Sushant Singh Rajput Case NCB Arrest Drugs Peddler Hemal Shah)
हेही वाचा :
Video | ‘रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना…’, कीर्तीचा हा डान्सिंग अंदाज पाहून चाहतेही म्हणाले वा!