Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant | सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी अपडेट

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास सध्या सीबीआय करत आहे. सीबीआयने अद्याप याप्रकरणी चार्जशीट दाखल केलेलं नाही.

Sushant | सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी अपडेट
Devendra Fadnavis and Sushant Singh RajputImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 3:12 PM

मुंबई : जवळपास तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत त्याच्या वांद्रे इथल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. सुशांतने आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. मात्र त्याची आत्महत्या झाल्याचा संशय चाहत्यांनी व्यक्त केला. हा विषय नंतर इतका मोठा झाला की सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. सीबीआयकडे हे प्रकरण वर्ग केल्यानंतर त्यात विशेष काही प्रगती झाल्याचं पहायला मिळालं नाही. आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट दिली आहे.

या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरुवातीला सुशांतच्या प्रकरणात कोणते ठोस पुरावे नव्हते. जी काही माहिती उपलब्ध होती की ऐकिवातली माहिती होती. नंतर काही लोकांनी त्यांच्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा केला. या लोकांशी संपर्क साधला गेला आणि पोलिसांकडे ते पुरावे सादर करण्यास त्यांना सांगण्यात आलं. या लोकांनी सादर केलेल्या पुराव्यांची विश्वासार्हता तपासली जात आहे. हे पुरावे विश्वासार्ह असतील तर त्याआधारे पुढील कारवाई नक्कीच केली जाईल. मात्र आता मी त्याबद्दल काहीही बोलणं घाईचं ठरेल. योग्य वेळी मी त्यासंदर्भात बोलेन.”

सीबीआय करत आहे सुशांतच्या मृत्यूचा तपास

सुशांतच्या निधनानंतर बिहार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर ही केस केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांच्या तपासानंतरही सीबीआयने अद्याप आरोपपत्र दाखल केलं नाही किंवा तो खटला बंद केला नाही. इतकंच नव्हे तर तपास कुठपर्यंत आला आहे याबद्दलही सीबीआयने मौन बाळगलं आहे. 2020 मध्ये स्थानिक वांद्रे पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक कलाकार आणि निर्मात्यांचे जबाब नोंदवले होते. तर सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आत्महत्या असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर प्रश्नांचा भडीमार झाला. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्जच्या अँगलने तपास करताना एनसीबीने रियाला अटकसुद्धा केली होती. रियाच्या भावाने सुशांतला ड्रग्ज पुरवले, असा आरोप करण्यात आला होता. अटकेनंतर जवळपास महिनाभर ती तुरुंगात होती. रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत हे एकमेकांना डेट करत होते. सुशांतच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर फोटो पोस्ट तिने रिलेशनशिप जाहीर केलं होतं. हे दोघं 2020 च्या अखेरीस लग्न करणार होते, अशीही चर्चा होती. मात्र त्याच वर्षी जून महिन्यात सुशांत मृतावस्थेत आढळला होता.

'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.