‘मला पुन्हा तुरुंगात…’, एक्स बॉयफ्रेंडच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने भीती व्यक्त केली तेव्हा…
राहत्या घरात अभिनेत्याने शेवटचा श्वास घेतल्यानंतर गर्लफ्रेंडला तुरुंगात जाण्याची वाटलेली भीती; म्हणाली होती, 'मला पुन्हा तुरुंगात...', अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी स्वतःचं आयुष्य फार कमी वयात संपवलं आणि जगाचा निरोप घेतला. प्रसिद्ध सेलिब्रिटींनी देखील परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली आहे. ज्यामुळे इंडस्ट्री आणि चाहत्यांमध्ये मोठी खळबळ माजली. प्रसिद्ध सेलिब्रिटींनी टोकाचं पाऊल उचलल्यानंतर त्याचे पडसाद सोशल मीडियावर दिसायला लागतात. एवढंच नाही तर, सेलिब्रिटींच्या निधनानंतर जवळच्या व्यक्तींना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागलं. बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्रीअशी आहे जिला एक्स बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर तुरुंगवास भोगावा लागला.
ज्या अभिनेत्री बॉयफ्रेंडच्या आत्महत्येनंतर तुरुंगवास भोगला ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रिया चक्रवर्ती आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर रिया हिने कठीण परिस्थितीचा सामना केला. पण सुशांतच्या मृत्यू प्रकरणी क्लोजर रिपोर्ट मिळाल्यानंतर रिया हिला दिलासा मिळाला आहे.




View this post on Instagram
रिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ‘रोडीज XXX’ मध्ये गँग लीडर म्हणून काम करत आहे. या शोमध्ये रिया हिने तुरुंगाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. विनोदी अंदाजात अभिनेत्री तुरुंगवास भोगल्यानंतर वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र रिया हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
शोच्या एका टास्कमध्ये सर्व लीडर्सना एका पिंजऱ्यात बंद केलं होतं. तेव्हा टीमचे सदस्य त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा रिया विनोदी अंदाजात म्हणाली, ‘मला पुन्हा तुरुंगात जायचं नाही. मी नाही जाणार तुरुंगात…’ रियाचं वक्तव्य ऐकून सर्वच हसू लागले.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, 14 जून 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली. ज्याचा फटका संपूर्ण इंडस्ट्रीला बसला. रिया चक्रवर्तीसोबतच अनेकांचा जबाब पोलिसांनी नोंदवला. तर रिया हिला 27 दिवस तुरुंगवास भोगावा लागला.