AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Salian | सुशांतची मॅनेजर दिशा सालियानच्या एक्स बॉयफ्रेंडने केलं लग्न; ‘या’ अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनचा 2020 मध्ये मृत्यू झाला होता. दिशाने आत्महत्या केली होती अशी चर्चा होती. मात्र तिचा मृत्यू हा केवळ अपघात होता, असं सीबीआयने स्पष्ट केलं. 28 वर्षीय दिशाने बऱ्याच सेलिब्रिटींसाठी मॅनेजर म्हणून काम केलं होतं.

Disha Salian | सुशांतची मॅनेजर दिशा सालियानच्या एक्स बॉयफ्रेंडने केलं लग्न; 'या' अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ
दिशा सालियानच्या मृत्यूच्या दोन वर्षांनंतर एक्स बॉयफ्रेंड रोहन रायचं लग्नImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 8:37 AM

काश्मीर | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनने 8 जून 2020 रोजी मुंबईतील एका इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली होती. त्यावेळी दिशाचा साखरपुडा टेलिव्हिजन अभिनेता रोहन रायशी झाला होता. आता दिशाच्या मृत्यूच्या जवळपास दोन वर्षांनंतर रोहनने लग्न केलं आहे. ‘पिया अलबेला’ या मालिकेतील सहअभिनेत्री शीन दासशी त्याने 22 एप्रिल रोजी काश्मीरमध्ये लग्नगाठ बांधली. या मालिकेत रोहनने शीनच्या ऑनस्क्रीन भावाची भूमिका साकारली होती. मालिकेच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती.

दिशाच्या मृत्यूनंतर रोहनने काही काळ सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. त्या कठीण काळात शीनने त्याची खूप साथ दिली आणि आयुष्यात पुढे जाण्यास मदत केली असं म्हटलं जातं. शीन ही स्वत: एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने बऱ्याच मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

शीन आणि रोहन यांनी काश्मीरमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केलं. काश्मीर हे शीन दासचं मूळ गाव आहे. त्यामुळे काश्मिरी विवाहपद्धतींनुसार दोघांचं लग्न पार पडलं. या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनचा 2020 मध्ये मृत्यू झाला होता. दिशाने आत्महत्या केली होती अशी चर्चा होती. मात्र तिचा मृत्यू हा केवळ अपघात होता, असं सीबीआयने स्पष्ट केलं. 28 वर्षीय दिशाने बऱ्याच सेलिब्रिटींसाठी मॅनेजर म्हणून काम केलं होतं. त्यात सुशांतचाही समावेश होता. दिशाच्या मृत्यूनंतर आठवडाभरातच सुशांतचं निधन झालं होतं. दिशाच्या मृत्यूनंतर जवळपास दोन वर्षांनी रोहन आणि शीन एकमेकांना डेट करू लागले होते.

रोहन आणि शीन यांनी 2018 मध्ये ‘पिया अलबेला’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. दिशाच्या मृत्यूनंतर या दोघांमधील जवळीक वाढली होती. “शूटिंगदरम्यान आमच्यात चांगली मैत्री होती, मात्र माझ्या कठीण काळात तिने माझी खूप साथ दिली. तेव्हापासून आमच्यात अधिक जवळीक निर्माण झाली”, असं रोहनने सांगितलं होतं.

सुशांत सिंह राजपूत वांद्रेत तर दिशा सालियन मालाडमध्ये राहायची. 8 जून 2020 रोजी दिशा सालियानचा इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. त्याच्या 6 दिवसांनंतर म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झाला. त्यामुळे या दोन्ही मृत्यूंमध्ये काहीतरी तार असल्याचा संशय वर्तवला गेला होता. त्याकाळी पोलिसांनी दिशा सालियनच्या मृत्यूला आत्महत्या ठरवलं होतं. मात्र नंतर सीबीआयनं दिशा सालियनच्या मृत्यूला अपघात ठरवलं.

ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा.
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री.
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक.
दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी - मोदी
दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी - मोदी.
मोदींनी आदमपूर एअरबेसबाबत पाकच्या खोट्या दाव्यांचा बुरखा टराटरा फाडला
मोदींनी आदमपूर एअरबेसबाबत पाकच्या खोट्या दाव्यांचा बुरखा टराटरा फाडला.
शोपियानमध्ये ठार केलेल्या 2 दहशतवाद्यांची ओळख पटली
शोपियानमध्ये ठार केलेल्या 2 दहशतवाद्यांची ओळख पटली.
ऑपरेशन सिंदूरचा हिरो, ज्याच्यामुळे पाकला फुटला घाम, अमरप्रीत सिंग कोण?
ऑपरेशन सिंदूरचा हिरो, ज्याच्यामुळे पाकला फुटला घाम, अमरप्रीत सिंग कोण?.