Ankita Lokhande हिच्यासाठी सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा मेसेज; चाहत्यांच्या डोळ्यात पाणी

Ankita Lokhande | एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिला विसरु शकत नव्हता सुशांत सिंह राजपूत.. शेवटचा मेसेज करत म्हणाला...; सध्या सर्वत्र अंकिता - सुशांत यांच्या नात्याची चर्चा... का घेतला होता दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय.. सर्वत्र चर्चांना उधाण

Ankita Lokhande हिच्यासाठी सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा मेसेज; चाहत्यांच्या डोळ्यात पाणी
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 2:41 PM

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. २०२० मध्ये सुशांत याने स्वतःला संपवलं. तर अंकिता देखील तिच्या खासगी आयुष्यात पुढे गेली आहे. पण सुशांत याच्यापासून वेगळं होण्याचं दुःख तिला सहजासहजी विसरता आलं नाही. सुशांत आणि अंकिता यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. रिल लाईफमध्येच नाही तर, खासगी आयुष्यात दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. २०१० पासून सुशांत आणि अंकिता यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. दोघे कायम चाहत्यांना कपल गोल्स द्यायचे.

सुशांत यांने संपूर्ण जगासमोर अंकिता हिला प्रपोज केला होता. अभिनेत्याने ‘झलक दिखला जा 4’ मध्ये स्वतःच्या मनातील भावना अंकिता आणि सर्वांसमोर व्यक्त केल्या होत्या. एवढंच नाही. २०१६ मध्ये दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. पण दोघांचं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही आणि सुशांत – अंकिता यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

रिपोर्टनुसार, सुशांत याला करियरमध्ये पुढे जायचं होतं, बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करायची होती. म्हणून त्यांनी अंकिता हिच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.. असं कारण समोर आलं. पण विभक्त झाल्यानंतर सुशांत याने अंकिता हिला एक मेसेज केला होता आणि मेसेज अंकितासाठी शेवटचा मेसेज होता.

हे सुद्धा वाचा

अंकिता हिने २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मणिकर्णिका’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हा सुशांत याने अंकिता हिला शुभेच्छा दिल्या होत्या. सुशांत याने अंकिता हिच्या पोस्टवर लिहिली होतं की, ‘खूप छान वाटत आहे अंकिता… तुला पाहून मी आनंदी आहे.. देव तुला आनंद देओ आणि तुला यश मिळूदे…’ हा अंकिता हिच्यासाठी सुशांत याचा शेवटचा मेसेज होता.

सुशांत याने ब्रेकअपचा निर्णय घेतल्यानंतर अंकिता पूर्णपणे कोलमडली होती. अखेर तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली. २०१९ मध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला. त्यानंतर २०२१ मध्ये विकी आणि अंकिता यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता विकी याच्यासोबत अभिनेत्री वैवाहिक आयुष्याचा आनंद घेताना दिसत आहे. एवढंच नाही तर, सध्या दोघेही ‘बिग बॉस 17’ मध्ये दिसत आहेत.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.