सुशांत मला सतत…, अभिनेत्यासोबत असलेले ‘प्रेमसंबंध’ मान्य करत साराचा खळबळजनक खुलासा
Sara Ali Khan: सुशांत सिंह राजपूत कधीच निष्ठावंत नव्हता, तो मला सतत…, सारा अली खानचा मोठा खुलासा आणि फार्महाऊसमध्ये दोघांनी एकत्र व्यतीत केलेले क्षण... अनेक वर्षांनंतर सत्य अखेर समोर

Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खान हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत आली. सारा हिच्या नावाची चर्चा अनेक अभिनेत्यांसोबत झाली. पण दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली देत सारा हिने मोठा खुलासा होता. ‘सुशांत कधीच माझ्यासोबत निष्ठावंत नव्हता…’ असं वक्तव्य सारा अली खान हिने पोलीस चौकशीत केलं होतं.
सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणात एनसीबीने सारा अली खान हिला चौकशीसाठी बोलावलं होतं. तेव्हा अभिनेत्रीने मोठा खुलासा केला होता. चौकशीत आम्ही रिलेशनशिपमध्ये असल्याचा स्वीकार सारा हिने केला. शिवाय सुशांत बद्दल मोठं सत्य देखील अभिनेत्री सांगितलं होतं.
View this post on Instagram
सारा हिने दिलेल्या माहितीनुसार, नात्यामध्ये सुशांत कधीच निष्ठावंत नव्हता. सारा म्हणाली होती, ‘सुशांत प्रचंड पजेसिव होता. माझ्या आगामी सिनेमा सुशांतला कास्ट करा… असं दिग्दर्शकांना जाऊन सांग. असं तो सतत म्हणायचा…’ याचदरम्यान, सारा हिने ड्रग्स सेवनाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. ‘सिनेमाच्या शुटिंग दरम्यान मी सिगरेट ओढली होती…’ अशी कबुली साराने चौकशीमध्ये दिली होती.
सुशांत आणि सारा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, सुशांत याने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. तर सारा हिने ‘केदारनाथ’ सिनेमातून सुशांत सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमातील दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देखील दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं.
सुशांत याच्या निधनानंतर सारा कायम अभिनेत्याच्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.