SSR Case | सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींची अडचण कायम, कोर्टानं निकाल राखीव ठेवला!

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात (Sushant Singh Rajput Case) अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) सुशांतच्या दोन्ही बहिणींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे

SSR Case | सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींची अडचण कायम, कोर्टानं निकाल राखीव ठेवला!
सुशांतसिंह राजपूत
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 5:58 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात (Sushant Singh Rajput Case) अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) सुशांतच्या दोन्ही बहिणींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. ज्यामध्ये रियाने सुशांतच्या बहिणींना त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवले आहे. या एफआयआरला सुशांतच्या बहिणींनी न्यायालयात आव्हान दिले होते. ज्याची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात झाली, मात्र कोर्टाने हा निकाल राखीव ठेवला आहे. यामुळे सुशांतच्या बहिणींना अजूनही दिलासा मिळालेला नाही. (Sushant Singh Rajput’s sisters’ problem persists, court reserved judgment)

रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणी प्रियांका सिंह, मीतू सिंह आणि एम्सचे डॉ. तरुण कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द व्हावा म्हणून त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सुशांतची बहीण प्रियांकाने डॉक्टरांना भेटून सुशांतसाठी बनावट प्रिस्क्रिप्शन लिहिले असल्याचा आरोप रियाने केला आहे.

सुशांतची मानसिक स्थिती जाणून न घेता औषधे लिहून दिली जात होती. सुशांतला 8 जून रोजी औषधे दिली गेली आणि 14 जूनला सुशांतने आत्महत्या केली असा आरोपही रियाने केला आहे. त्यामुळे या तिघांवरही आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप रियाने केला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास सुरू असून, सीबीआयसह ईडी आणि एनसीबी देखील या तपासात गुंतल्या आहेत. सुशांतचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण, हत्या की आत्महत्या या सर्व गोष्टी जगासमोर आणण्यासाठी त्याच्या बहिणी रात्रंदिवस लढत आहेत.

मात्र, सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात त्याच्या बहिणी देखील अडकल्या आहेत. रिया चक्रवर्ती हिने सप्टेंबरमध्ये सुशांतच्या बहिणींविरोधात एफआयआर दाखल केला होता. हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी सुशांतच्या बहिणींनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, हा गुन्हा रद्द करण्यास पोलिसांनी विरोध केला होता आणि त्यावर आज कोर्टात सुनावणी झाली.

संबंधित बातम्या : 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी, ईडीकडून शौविक चक्रवर्तीची 18 तास चौकशी

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध निर्माते आदित्य चोप्रा यांची 3 तास कसून चौकशी

(Sushant Singh Rajput’s sisters’ problem persists, court reserved judgment)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.