Sushmita Sen हिने ललित मोदीसोबत असलेल्या नात्यावर सोडलं मौन; धक्कादायक सत्य समोर

ललित मोदी याच्यासोबत नावाची चर्चा रंगल्यानंतर सेलिब्रिटींनी सुष्मिता सेन हिला दिला सल्ला; अखेर अभिनेत्रीने नात्यावर सोडलं मौन... सध्या सर्वत्र सुष्मिताच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Sushmita Sen हिने ललित मोदीसोबत असलेल्या नात्यावर सोडलं मौन; धक्कादायक सत्य समोर
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 12:29 PM

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री सुष्मिता सेन कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सुष्मिता आणि ललित मोदी दोघांचे रोमांटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. ललित मोदी याने सुष्मिता हिच्यासोबत काही फोटो पोस्ट करत एकमेकांना डेट करत असल्याची कबुली दिली होती. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. पण आजही दोघांच्या नात्याची चर्चा तुफान रंगलेली असते. आता सुष्मिता हिने ललित मोदी याच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र सुष्मिता आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे.

दरम्यान, सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या नावाची चर्चा रंगली तेव्हा अभिनेत्रीला ‘गोल्ड डिगर’ म्हणून ट्रोल करण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. पण होत असलेल्या टीका माझ्यापर्यंत येत होत्या, ही चांगली गोष्ट आहे. कारण गोल्ड डिगरला मी परिभाषित करु शकली…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘अपमान तेव्हा अपमान असतो… जेव्हा तुम्ही प्रभावित होत असतात.. पण मी कधीच प्रभावित झाली नाही. मला अनेकांनी यावर काही बोलूस असा सल्ला दिला. पण जर चर्चा माझ्याबद्दल रंगत आहे, तर मी का गप्प बसू… मी सिंगल आहे… आणि याबद्दल तुम्हाला कोणती अडचण नसायला हवी…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र सुष्मिता हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

सुष्मिता सेन हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘ताली’ सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांनी जीओ सिनेमावर ‘ताली’ वेब सीरिज पाहता येणार आहे. सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘ताली’ वेब सीरिज सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे. १ आता चाहते १५ ऑगस्टच्या प्रतीक्षेत आहेत.

‘ताली’ या वेब सीरिजसोबतच अभिनेत्री ‘आर्य ३’ वेब सीरिजमुळे देखील तुफान चर्चेत आहे. ‘आर्या’ सीरिजच्या पहिल्या दोन भागांनी देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सुष्मिता तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. (sushmita sen lalit modi dating)

सुष्मिता सेन हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सुष्मिता चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.