Duniyadari प्रदर्शित होताच स्वप्नील जोशीला आला मुंबई आयुक्तांचा फोन, त्यानंतर…

सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांची कमाई करत असताना मुंबई आयुक्तांचा स्वप्नील जोशी याला का आला फोन? खुद्द अभिनेत्याने सांगितलं कारण...

Duniyadari प्रदर्शित होताच स्वप्नील जोशीला आला मुंबई आयुक्तांचा फोन, त्यानंतर...
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 10:16 AM

मुंबई | 19 जुलै 2023 : ‘दुनियादारी’ सिनेमाला आज १० वर्ष पूर्ण झाली आहेत. पण सिनेमा आणि कलाकारांना चाहते विसरु शकलेले नाहीत. सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाल्यामुळे अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. ‘दुनियादारी’ सिनेमाला फक्त तरुणांनीच नाही तर, प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृह हाऊसफुल झाले होते. प्रेक्षकांनी तिकिटं मिळत नव्हती. सिनेमातील डायलॉग, गाणी, अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांच्यामधील केमिस्ट्रीला तर चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आजही सिनेमातील अनेक डायलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

दरम्यान, ‘दुनियादारी’ सिनेमाला आज १० वर्ष पूर्ण झाल्यामुळे स्वप्निल जोशी याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मुलाखतीदरम्यानचा व्हिडीओ अभिनेत्याने पोस्ट केला आहे. सध्या स्वप्नीलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. (duniyadari digya sai fight)

हे सुद्धा वाचा

स्वप्नील व्हिडीओमध्ये म्हणतोय, ‘माझा ‘दुनियादारी’ चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्यानंतर मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी केला. ते मला म्हणाले, माझं तुझ्याकडे काम आहे. मला तुझ्या सिनेमाचं तिकीट मिळत नाहीये, मला तिकीट हवंय. मी थोडा अडखळलो.. पुढे मी त्यांना म्हणालो, सर तुम्ही आयुक्त आहात. तुम्हाला मी काय तिकीट देणार.’

यावर आयुक्त अभिनेत्याला म्हणाले, ‘अरे मस्करी करत आहे. मला तिकीट मिळालं आहे… तुझा सिनेमा खूप चांगला आहे… हेच सांगायला फोन केला होता… कौतुक आहे तुमचं…’ असं स्वप्नील व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे… स्वप्नीलने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (duniyadari scene)

आज ‘दुनियादारी’ सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या… महत्त्वाचं म्हणजे काही सिनेमे कधीही विसरता येत नाहीत, अशाच सिनेमांपैकी एक म्हणजे ‘दुनियादारी’ सिनेमा. ‘दुनियादारी’ सिनेमाने फक्त बॉक्स ऑफिसवर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं…

स्वप्नील याने सोशल मीडियावर ‘दुनियादारी’ सिनेमाबद्दल काही आठवणी शेअर केल्या आहेत. ‘दुनियादारी’ सिनेमामुळे सिनेमातील प्रत्येक कालाकाराच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. स्वप्नील जोशी याला सतत बच्चू म्हणून हाक मारणारी अभिनेत्री सई ताम्हणकर… म्हणजे ‘दुनियादारी’ सिनेमातील शिरीन.. हिला देखील चाहते विसरु शकलेले नाहीत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.