पाठवणी करताना स्वरा भास्कर अश्रू अनावर; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘लिव्ह इनमध्ये राहणारे लोक… ‘
मोठ्या थाटात लग्न झाल्यानंतर पाठवणी करताना स्वरा भास्कर हिचं रडू थांबेना; अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी लिव्हइन रिलेशनशिपबद्दल उपस्थित केले प्रश्न...
मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker Wedding) हिचं लग्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाच्या नेत्यासोबत लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. लग्नानंतर काही दिवस स्वरा भास्कर ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील होती. 16 फेब्रुवारी रोजी या दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर काही व्हिडीओ आणि फोटो खुद्द स्वराने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र स्वराच्या लग्नाची चर्चा आहे. पण अभिनेत्रीचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. व्हिडीओमध्ये स्वरा गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये दिसत आहे. एवढंच नाही तर पाठवणी करत असताना अभिनेत्रीला अश्रू अनावर झाल्याचं चित्र व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तिच्या आजू-बाजूला आईसोबत अनेक नातेवाईक उभे आहेत. पाठवणी करताना एक व्यक्ती कागदावर लिहिलेली गाणी गाताना दिसत आहे. गाणी ऐकत असताना स्वराला रडू आवरत नाही. स्वराला रडताना पाहून अभिनेत्रीच्या भोवती उभे असलेले नातेवाईक देखील रडताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा आहे.
स्वराचा हा व्हिडीओ तिच्या मैत्रिणीने ट्विटरवर शेअर केला आहे. शिवाय मैत्रिणीने कॅप्शनमध्ये ‘बेस्टी स्वरा भास्कर हिची पाठवणी करताना… आम्ही प्रत्येक जण भावुक झालो… स्वरा भास्कर हिच्या वडिलांनी या क्षणी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला…’ स्वराच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रेम व्यक्त केलं, तर काहींनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे.
Seeing off bestie @ReallySwara on her vidai, an emotionally charged and overwhelming moment for all of us…tough guy, Ishan Bhaskar a.k.a. Abu, in shades for a reason ? and the gruff Commodore @theUdayB chose to remain out of frame. Special thanks to Muba. ❤️❤️❤️ pic.twitter.com/uYv8OTs27m
— Sinjini (@sinjini_m) March 18, 2023
व्हिडीओ पाहून स्वराला ट्रोल करत अनेकांनी वाईट अभिनय असं म्हटलं आहे. तर अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘फहाद याच्यासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होती, तर आता पाठवणी करताना का रडते?’ एवढंच नाही तर, अनेकांनी अभिनेत्रीला बुरखा घालण्याचा सल्ला दिला. सध्या स्वराच्या पाठवणीच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
फहाद-स्वराची लव्हस्टोरी फहाद-स्वराची लव्हस्टोरी अत्यंत खास आहे. सीएएविरोधातील रॅलीमध्ये या दोघांची भेट झाली आणि त्याचवेळी दोघांचे विचारही जुळले. आता लग्न करत फहाद-स्वरा यांनी त्यांच्या नात्याला नवीन नाव दिलं आहे. स्वरा आणि फहादने 6 जानेवारी रोजी न्यायालयात लग्नाची कागदपत्रे सादर केली होती. त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार या दोघांनी लग्न केलं आहे.
स्वरा भास्कर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय अनेक राजकीय मुद्द्यांवर स्वरा स्पष्ट भूमिका मांडताना दिसली. ज्यामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली. पण आता स्वरा तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.