Marathi Serial : ‘स्वराज-कृतिकाच्या लग्नाची धामधूम आणि बरंच काही’, ‘सांग तू आहेस का’ मालिकेत लगीनघाई

मराठी मालिकांमधील ‘सांग तू आहेस का’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. रसिक प्रेक्षकांकडून या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना प्रचंड प्रेम मिळत आहे. (Swaraj-Kritika's wedding festivities in 'Sang tu ahes ka ?' Serial)

Marathi Serial : 'स्वराज-कृतिकाच्या लग्नाची धामधूम आणि बरंच काही', ‘सांग तू आहेस का’ मालिकेत लगीनघाई
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 4:17 PM

मुंबई : मराठी मालिकांमधील ‘सांग तू आहेस का’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. रसिक प्रेक्षकांकडून या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना प्रचंड प्रेम मिळत आहे. आता या मालिकेत अधिक धमाल अनुभवता येणार आहे. कारण आता लवकरच स्वराज आणि कृतिकाच्या लग्नाची धामधूम मालिकेत पाहायला मिळणार आहे. (Swaraj-Kritika’s wedding festivities in ‘Sang tu ahes ka ?’ Serial)

लग्नात पाहायला मिळणार नवा ट्विस्ट

मात्र या लग्नातही मोठा ट्विस्ट दडलेला आहे.  डॉ वैभवीला स्वराजपासून दूर ठेवण्यासाठी सुलू हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहे. लग्नात तर तिने वैभवीला जीवे मारण्याचा घाटच घातला आहे. वैभवीचा जीव वाचवण्यात स्वराज यशस्वी होणार का हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

कृतिका आणि स्वराजचा लूक लक्ष वेधून घेणारा

लग्नातला हा ट्विस्ट उत्कंठावर्धक आहेच पण स्वराज कृतिकाच्या रॉयल लग्नासाठी त्यांचा खास लूक डिझाईन करण्यात आला आहे. पारंपरिक नऊवारी साडीतील कृतिका आणि डिझायनर शेरवानी परिधान केलेला स्वराजचा लूक लक्ष वेधून घेत आहे. छोट्या पडद्यावरच्या आजवरच्या लग्नसोहळ्यांमधला हा रॉयल आणि हटके लूक आहे. वेशभूषाकार संपदा महाडिकने हा खास लूक डिझाईन केला आहे.

सिद्धार्थ पुन्हा अनुभवणार लग्नाचा थाट

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर काही दिवसांपूर्वीच मिताली मयेकरसोबत विवाहबंधनात अडकला. आता पुन्हा एकदा मालिकेतल्या लग्नासाठी तो सज्ज झाला आहे. सिद्धार्थ साकारत असलेल्या स्वराज या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेतल्या सर्वच पात्रांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळे ‘सांग तू आहेस का’ मालिकेतलं पुढचं वळण मनोरंजनाची पर्वणी ठरेल यात शंका नाही. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘सांग तू आहेस का’ .

संबंधित बातम्या

Marathi Serial : ‘मुलगी झाली हो’ मालिकेला भावनिक वळण, अखेर विलास करणार माऊचा मुलगी म्हणून स्वीकार

Birthday Special | आदर्श वाटावा असा ‘फॅमिली मॅन’ इमरान हाश्मी, किसिंग सीनवर अशी असते पत्नीची प्रतिक्रिया!

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.