Taapsee Pannu हिने बॉलिवूडकरांबद्दल सांगितलं मोठं सत्य; म्हणाली, ‘मोठ्या पार्टीमध्ये प्रत्येक सेलिब्रिटी…’

कोट्यवधींची संपत्ती असताना मोठ्या पार्ट्यांमध्ये असं करतात सेलिब्रिटी? तापसीने सांगितलेल्या गोष्टीवर तुमचा विश्वास देखील बसणार नाही, कारण..., बॉलिवूडचं आणखी एक सत्य अखेर समोर...

Taapsee Pannu हिने बॉलिवूडकरांबद्दल सांगितलं मोठं सत्य; म्हणाली, 'मोठ्या पार्टीमध्ये प्रत्येक सेलिब्रिटी...'
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 11:12 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या पार्ट्या होतात. अशा पार्ट्या ज्यांची चर्चा पुढचे अनेक दिवस रंगलेली असते. पार्ट्यांसाठी केलेला खर्च देखील फार मोठा असतो. पण यामागचं सत्य तुम्हाला माहिती आहे का? बॉलिवूडमधील प्रत्येक पार्टी फार मोठी असते, पण पार्टीमध्ये प्रत्येक सेलिब्रिटी रिकाम्या हाताने पोहोचतो. कोणीही गिफ्ट घेवून येत नाही. मग ती बर्थडे पार्टी असो किंवा कोणतं दुसरं सेलिब्रेशन.. बॉलिवूडचं हे सत्य खुद्द अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिने सांगितलं आहे. अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली, सामान्य लोकांपेक्षा बॉलिवूडकर प्रचंड वेगळे आहेत. बर्थडे पार्टी दिवाळी पार्टी… इतर कोणत्याही पार्टीमध्ये सेलिब्रिटी काहीही घेवून जात नाहीत.

एका मुलाखतीत तापसीने अभिनेता शाहरुख खान याची बर्थडे पार्टीत उपस्थित राहते असं सांगितलं. जेव्हा तापसीला विचारलं शाहरुखला भेटवस्तू म्हणून काय घेवूनन जाते असं विचारलं, तेव्हा अभिनेत्री म्हणाली, ‘शाहरुख खान याला कोण कशाला काही घेवून जाईल? त्याच्याकडे आज सर्व काही आहे.. त्यामुळे त्याला काय देवू शकतो…’

पुढे होस्टने तापसीला विचारलं, शाहरुखला कोणतं पुस्तक भेट म्हणून द्यायचं असेल तर? यावर अभिनेत्री म्हणाला, ‘शाहरुख खान याला कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात मला माहिती नाही. माझ्या जागी असलेला कोणताही व्यक्ती एक विचार करेल की, शाहरुखला भेटवस्तू म्हणून काय द्यायचं.. जर शाहरुखला गिफ्ट दिलं, तर तो मोठ्या मना घेईल. पण जर त्याला ते गिफ्ट आवडलं नाही तर, पुढच्या पार्टीला तो आपल्याला बोलावणारच नाही… त्यामुळे बॉलिवूडकरांना गिफ्ट देण्यासाठी प्रचंड विचार करावा लागतो…’

हे सुद्धा वाचा

तापसीने महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात होणाऱ्या दिवाळी पार्टीबद्दल देखील सांगितलं आहे. तापसी म्हणाली, ‘दिवाळी पार्टीमध्ये कोणीही काहीही घेवून जात नाही.’ शोचा होस्ट हसल्यानंतर तापसी म्हणाली, ‘बॉलिवूडमध्ये प्रत्येक जण कंजूस आहे…’ सध्या तापसीने बॉलिवूडबद्दल सांगितलेलं सत्य प्रत्येकाला थक्क करत आहे.

पुढे तापसी म्हणाली, ‘बॉलिवूडमध्ये नवीन असताना मी कायम पार्टी असेल त्याठिकाणी गिफ्ट घेवून पोहोचायची. पण जेव्हा मी पाहिलं कोणीही गिफ्ट घेवून येत नाही, त्यानंतर मी देखील गिफ्ट घेवून जाणं बंद केलं. पूर्ण पार्टीमध्ये मी एकटी अशी असायची जी गिफ्ट घेवून जायची…’ पण आता तापसी पार्टीमध्ये गिफ्ट घेवून जात नाही. तापसी कायम तिच्या स्पष्ट भूमिकेमुळे चर्चेत असते.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.