Munmun Dutta हिला मशीदीत जाणं पडलं महागात; म्हणाली, ‘कोणी मला काही बोलेल त्याआधीच मी…’
'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम मूनमून दत्ता हिला मशीदीत जाणं पडलं महागात; अभिनेत्रीने पोस्ट केलेले फोटो पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले...
मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेत ‘बबीता जी’ भूमिका साकारणारी अभिनेत्री मूनमून दत्ता सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सध्या अभिनेत्री दुबई याठिकाणी आईसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री एकापेक्षा एक फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या सर्वत्र मूनमून दत्ता हिच्या फोटोंची चर्चा सुरु आहे. अभिनेत्रीने मशीदीच्या बाहेरून काही फोटो पोस्ट केलं आहेत. सध्या मूनमून हिचे फोटो सोशल मीडियावर तुफार व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचे फोटो काही चाहत्यांना आवडले आहेत, तर काहींनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे.
फोटो पोस्ट करत मूनमून दत्ता कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘कोणी काही बोलेले किंवा विचार करेल याआधी मला सांगायचं आहे की, मी हिंदू आहे आणि यावर मला गर्व आहे. मी दुसऱ्या देशात आहेत, तेथील संस्कृती वेगळी आहे. मला त्यांचा आदार करायला हवा.. त्याच प्रकारे इतर धर्मातील लोकांकडून अपेक्षा करते की त्यांनी देखील माझ्या धर्माचा आणि श्रद्धांचा आदर करावा..’ सध्या सोशल मीडियावर मूनमून दत्ता हिची पोस्ट व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीची पोस्ट आतापर्यंत जवळपास ४ लाख ४० हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिली आहे. तिच्या पोस्टवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, ‘मंदिरं कमी आहेत का तू मशीदीत गेलीस.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हिंदू आहेस… मंदिरात जा…’ एवढंच नाही तर अनेकांनी मूनमून हिला ब्लॉक करा असं कमेंटमध्ये देखील नेटकरी म्हणत आहेत.
मूनमून कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या माध्यमातून मूनमून हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मूनमून सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या पंधरा वर्षांपासून चाहत्यांचे जबरदस्त असे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील कलाकारांची देखील सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोशल मीडियावर मालिकेतील विनोदी सीन व्हायरल होत असतात.