Bigg Boss 17 मध्ये होणार ‘तारक मेहता…’ फेम 2 कलाकारांची एन्ट्री! दोघांनी निर्मात्यांवर केले गंभीर आरोप

'तारक मेहता...' वाद सध्या शमलेला असला तरी, मालिकेतून निघालेल्या काही कलाकारांबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे, मलिकेतील दोन कलाकार 'बिग बॉस १७' मध्ये येणार असल्याच्या चर्चांना उधाण...

Bigg Boss 17 मध्ये होणार 'तारक मेहता...' फेम 2 कलाकारांची एन्ट्री! दोघांनी निर्मात्यांवर केले गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 7:44 AM

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका आणि ‘बिग बॉस’ शो प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. गेल्या काही दिवसांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका वादाच्या भोवऱ्यात होती. दरम्यान मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिकेला राम-राम देखील ठोकला. एवढंच नाही तर, कलाकारांनी सिनेमाचे निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप देखील केले. ‘तारक मेहता उल्टा चश्मा’ वाद काही प्रमाणात शमलेला असला तरी, मालिकेतील कलाकार निर्मात्यांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. पण आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील दोन कालाकारांबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. मालिकेतील दोन कलाकार ‘बिग बॉस 17’ मध्ये स्पर्धक म्हणून येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील तारक मेहता ही भूमिका निभावणारे अभिनेते शैलेश लोढा आणि बावरी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरिया देखील ‘बिग बॉस 17’ मध्ये स्पर्धक म्हणून येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघे देखील ‘बिग बॉस 17’ मध्ये मोठे खुलासे करतील असं सांगण्यात येत आहे. जर दोघांनी खुलासे केले तर, खळबळ माजेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, शैलेश लोढा आणि मोनिका भदोरिया दोघांनी याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण काही दिवसांपूर्वी मोनिका हिने ‘बिग बॉस’ मध्ये रस असल्याचं सांगितलं होतं. मी ‘बिग बॉस ओटीटी’ला फॉलो करते… असं वक्तव्य मोनिका हिने केलं होतं. एवढंच नाही तर, ‘बिग बॉस’साठी अप्रोच करण्यात आलं तर, नक्की ‘बिग बॉस’ची स्पर्धक म्हणून खेळेल असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे.

शैलेश लोढा यांच्या ‘बिग बॉस १७’ मध्ये स्पर्धकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती bigboss_17_updates नावाच्या इंस्टाग्राम पेजने दिली आहे. सध्या सर्वत्र ही सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. पण रंगणाऱ्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे… हे शैलेश आणि मोनिका यांनी अधिकृत घोषणा केल्यानंतर कळेल..

शैलेश आणि मोनिका यांच्याबद्दल सांगायचं झालं, शैलेश यांनी मानधन वेळेत मिळत नसल्यामुळे शोच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. मोनिकाने शोचे निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होतं. मोनिका हिने अनेक खुलासे करत निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. मोनिका भदोरिया आणि शैलेश दोघेही आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत आता काम करत नाहीत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.