Taarak Mehta | ‘तारक मेहता’ने अखेर सांगितलं मालिका सोडण्यामागचं खरं कारण; निर्मात्यांविषयी केला मोठा खुलासा

निर्मात्यांनी त्यांची फी परत केली नसल्याचेही आरोप झाले. त्यावर निर्माते असित कुमार मोदी यांचीही प्रतिक्रिया समोर आली. इतकंच नव्हे तर हे दोघं अप्रत्यक्षपणे एकमेकांवर निशाणा साधताना दिसले.

Taarak Mehta | 'तारक मेहता'ने अखेर सांगितलं मालिका सोडण्यामागचं खरं कारण; निर्मात्यांविषयी केला मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 1:50 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेशी संबंधित काही नकारात्मक चर्चा समोर येत आहेत. या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिकेला रामराम केला. त्यानंतर या चर्चांना उधाण आलं. निर्मात्यांनी त्यांची फी परत केली नसल्याचेही आरोप झाले. त्यावर निर्माते असित कुमार मोदी यांचीही प्रतिक्रिया समोर आली. इतकंच नव्हे तर हे दोघं अप्रत्यक्षपणे एकमेकांवर निशाणा साधताना दिसले. आता याप्रकरणी शैलेश लोढा यांनी अखेर मालिका सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

निर्मात्यांवर अप्रत्यक्ष निशाणा

शैलेश लोढा यांनी नुकताच एका साहित्यिक कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात त्यांनी सुंदर कविता वाचून दाखवल्या. त्यानंतर त्यांना जेव्हा मालिकेविषयी विचारण्यात आलं, तेव्हा ते म्हणाले, “जे मागे निघून गेलं, त्याच्याविषयी काय विचार करायचा? तुम्ही माझ्या इशाऱ्यांमधून माझं बोलणं समजून घ्या. पुस्तकं छापणारे पब्लिशर हिऱ्याची अंगठी घालून फिरत आहेत आणि लेखकाला आपलंच पुस्तक छापण्यासाठी पैसे द्यावे लागत आहेत. जेव्हा दुसऱ्यांच्या प्रतिभेतून कमावणारे व्यापारी स्वत:ला त्यांच्यापेक्षा मोठं समजू लागतात, तेव्हा त्यांना हे सांगणं खूप गरजेचं असतं की ते इतरांच्या प्रतिभेतून कमाई करत आहेत.”

“..तेव्हा माझा ज्वालामुखी फुटेल”

हे सर्व बोलताना निर्मात्यांवर निशाणा साधत ते पुढे म्हणाले, “मी ती व्यक्ती आहे, जिने आवाज उठवला. या जगातील कोणताच पब्लिशर एका लेखकापेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जगातील कोणताच निर्माता एखाद्या अभिनेत्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही. मी कवी आणि अभिनेता आहे. जेव्हा जेव्हा मी कवी किंवा अभिनेता असण्यावर किंवा माझ्या विचारांवर दबाव आणला जाईल, तेव्हा तेव्हा माझा ज्वालामुखी फुटेल.”

हे सुद्धा वाचा

शैलेश लोढा यांची फी थकवली?

शैलेश लोढा यांची सहा आकडी फी निर्मात्यांनी थकवल्याची चर्चा होती. गेल्या वर्षी त्यांनी ही मालिका सोडली. मालिकेत आता त्यांची जागा अभिनेता साहिल श्रॉफने घेतली आहे. शैलेश यांनी मानधन थकवल्याच्या चर्चांवर थेट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र एका मुलाखतीत ते उपरोधिकपणे म्हणाले होते, “यात काही नवीन नाही.”

“मालिका सोडल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास अनेकदा सांगूनही शैलेश लोढा यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा तुम्ही कोणताही शो किंवा कंपनी सोडता, तेव्हा तुम्हाला ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. कोणतीच कंपनी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय मानधन देत नाही”, असं मालिकेचे प्रोजेक्ट हेड सुहेल रमाणी म्हणाले.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.