कपाळावर भस्म, भगवे कपडे.. ‘तारक मेहता’ फेम शैलेश लोढा यांचा संन्यासी लूक पाहून चाहते हैराण!

या चर्चांदरम्यान आता शैलेश यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते एका मंदिरात ध्यानसाधना करत असल्याचं दिसत आहेत. त्यांनी साधूसंतांसारखा पोशाखसुद्धा केला आहे आणि कपाळावर भस्मही लावला आहे.

कपाळावर भस्म, भगवे कपडे.. 'तारक मेहता' फेम शैलेश लोढा यांचा संन्यासी लूक पाहून चाहते हैराण!
Shailesh LodhaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 7:39 PM

मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचा निरोप घेतल्यापासून अभिनेते शैलेश लोढा विविध कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मालिका सोडल्यानंतरही त्यांचं थकलेलं मानधन निर्मात्यांनी दिलं नसल्याची चर्चा होती. या चर्चांदरम्यान आता शैलेश यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते एका मंदिरात ध्यानसाधना करत असल्याचं दिसत आहेत. त्यांनी साधूसंतांसारखा पोशाखसुद्धा केला आहे आणि कपाळावर भस्मही लावला आहे.

शैलेश लोढा यांचा फोटो व्हायरल

हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, ‘हम को मन की शक्ती देना, मन विजय करे..’ सोशल मीडियावर हा फोटो सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. त्यांच्या या फोटोच्या कमेंट सेक्शनमध्ये काही जण ‘जय श्री राम’ असं लिहित आहेत. तर काही जण ‘ओम नम: शिवाय’ असं लिहित आहेत. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी त्यांना मालिकेत परतण्याचीही विनंती केली आहे.

हे सुद्धा वाचा

नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

एका युजरने मस्करीत लिहिलं, ‘तारक मेहता शो पाहण्यासाठीही शक्ती हवी, आता ती मालिका पहावीशी वाटत नाही’. काही चाहत्यांनी त्यांना असाही प्रश्न विचारला की त्यांनी संन्यास तर घेतला नाही ना?

‘तारक मेहता’ या मालिकेच्या निर्मात्यांकडून शैलेश यांना त्यांचं थकलेलं मानधन मिळालं नसल्याचं म्हटलं जात होतं. त्यावर आता निर्मात्यांकडूनही प्रतिक्रिया समोर आली आहे. “शैलेश लोढा यांनी मालिका सोडण्यापूर्वी बऱ्याच डॉक्युमेंट्सवर स्वाक्षरी केली नव्हती. त्यामुळे त्यांना फी दिली गेली नाही”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांना शैलश लोढा यांचा अप्रत्यक्ष टोमणा?

निर्मात्यांकडून आलेल्या या प्रतिक्रियेनंतर शैलेश यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. या पोस्टद्वारे त्यांनी निर्मात्यांना टोमणा मारल्याचं म्हटलं जातंय. ‘सुन लो.. कब तक भागेगा सच से, इतिहासों को सोच लिया कर, हर बात पर झूठ बोलने वाले, कभी आसमान की तरफ भी देख लिया कर’, असं त्यांनी लिहिलं होतं.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....