टप्पूसोबत बबिताच्या साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान ‘तारक मेहता..’ टीमने घेतली अभिनेत्रीची फिरकी

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत टप्पूची भूमिका साकारलेली अभिनेता राज अनाडकत याने अभिनेत्री मुनमुन दत्ताशी साखरपुडा केल्याची जोरदार चर्चा होता. या चर्चांनंतर आता मालिकेच्या टीमनेही बबिताजी अर्थात मुनमुनची फिरकी घेतली आहे.

टप्पूसोबत बबिताच्या साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान 'तारक मेहता..' टीमने घेतली अभिनेत्रीची फिरकी
मुनमुन दत्ता, राज अनाडकतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 8:34 AM

मुंबई : 15 मार्च 2024 | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बबिताजी आणि टप्पूची भूमिका साकारणारे कलाकार मुनमुन दत्ता आणि राज अनाडकत यांनी साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या दोघांनीही या चर्चा केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. बुधवारी संध्याकाळपासून मुनमुन आणि राज यांच्या साखरपुड्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. वडोदरामध्ये या दोघांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा केल्याचं म्हटलं जात होतं. या चर्चा ‘निव्वळ हास्यास्पद’ असल्याचं म्हणत मुनमुनने त्यावर संताप व्यक्त केला. तर दुसरीकडे राजनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहित साखरपुड्याच्या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं. या चर्चांचा फायदा घेत ‘तारक मेहता..’च्या टीमनेही मुनमुनची फिरकी घेतली आहे. सोशल मीडियावर त्यांनी मालिकेविषयी पोस्ट करताना त्यात मुनमुनची मस्करी केली आहे.

मालिकेच्या क्रिएटिव्ह टीमने सोशल मीडियावर प्रमोशन करताना मुनमुन आणि राजच्या साखरपुड्याच्या चर्चांचा आधार घेतला. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर अपलोड केला आहे. यामध्ये बबिताजी फोनवर बोलताना दिसत असून तिच्यासमोर लिहिलंय ‘हॅलो.. एक गुड न्यूज आहे.’ यामध्ये आणखी एक स्ट्रॅपलाइनसुद्धा लिहिली आहे. ‘बबिताजींची गुड न्यूज काय असेल?’ असा सवाल त्यात विचारण्यात आला आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

साखरपुड्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मुनमुन म्हणाली, “हे खरंच हास्यास्पद आहे. या चर्चांमध्ये कणभरही तथ्य नाही. अशा खोट्या बातम्यांवर स्पष्टीकरण देण्यात माझी ऊर्जा घालवण्यास मी नकार देते.” तर दुसरीकडे राजनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. ‘तुम्हा सर्वांना मी हे स्पष्ट करू इच्छितो की सोशल मीडियावर तुम्ही ज्या बातम्या पाहत आहात त्या सर्व खोट्या आणि तथ्यहीन आहेत’, असं त्यावर लिहिलं होतं.

मुनमुन आणि राज एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा बऱ्याच महिन्यांपासून आहेत. सेटवर या दोघांची आधी चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या चर्चा खोट्या असल्याचं मुनमुन आणि राजने याआधीही स्पष्ट केलं होतं. सध्या ‘तारक मेहता..’मध्ये मुनमुन काम करत असली तरी राजने खूप आधीच मालिका सोडली आहे. मुनमुन गेल्या 15 वर्षांपासून या मालिकेत बबिताची भूमिका साकारतेय. राज आणि मुनमुन यांच्या वयात 9 वर्षांचं अंतर आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.