Tamannaah Bhatia Dance : बॉलिवूड अभिनेता तमन्ना भाटियाचा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
तमन्नाची लस्ट स्टोरीज 2 ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. तर आता तमन्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
मुंबई : अभिनेत्री तमन्ना भाटिया ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं तिच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तमन्ना ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते. नुकतीच तमन्नाची लस्ट स्टोरीज 2 ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. तर आता तमन्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
नुकतंच तमन्नाचं कवाला हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविताना दिसत आहेत. तर आता या नवीन गाण्यावर तमन्नाने एअरपोर्टवर डान्स केला आहे. तिने एअरपोर्टवर पापाराझी सोबत कवाला गाण्यावर जबरदस्त असा डान्स केला. सध्या तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
काल तमन्नाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी ती ब्लॅक कलरच्या स्पोर्ट्स ब्रॅलेट, ट्राउझर्स आणि जॅकेटमध्ये दिसली. तर यादरम्यान तमन्नाला पापाराझींनी एअरपोर्टवर कवाला गाण्याचे हुक स्टेप करायला सांगितले. त्यानंतर तमन्ना पापाराझीला आपण एकत्र डान्स करू असं म्हणत त्याच्यासोबत ती जबरदस्त डान्स करते. सध्या तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, तमन्नाचा जेलर हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ती सुपरस्टार रजनीकांत सोबत दिसणार आहे. कवाला हे गाणं याच चित्रपटातील असून हे 6 जुलै रोजी प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात तमन्ना किलर डान्स मूव्ह्ज करताना दिसत आहे. तर या गाण्यात तिच्यासोबत रजनीकांतही दिसत आहे. या दोघांचा जेलर हा नवीन चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.