तमन्ना भाटिया हिच्या अडचणीत मोठी वाढ, अभिनेत्रीला थेट…
बॉलीवुड अभिनेत्री तमन्ना भाटिया यांना गुवाहाटी येथील ईडी कार्यालयात आयपीएल सामने बेकायदेशीरपणे पाहण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या HPZ ॲपशी संबंधित चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या ॲपच्या माध्यमातून करोडो रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवलाय. अभिनेत्रीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंगही बघायला मिळते. तमन्ना भाटिया हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच तमन्ना भाटिया हिला ईडीकडून समन्स पाठवण्यात आला. ज्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले. ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आलीये. तमन्ना भाटियाची गुवाहाटी येथील ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. यावेळी अभिनेत्री ही तिच्या आईसोबत ईडी कार्यालयात पोहोचली.
रिपोर्टनुसार, HPZ ॲपवर इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सामने बेकायदेशीरपणे पाहण्याचा प्रचार केल्याच्या आरोपावरून तमन्नाला ईडीने समन्स पाठवले होते. अभिनेत्री ॲपला प्रमोट करत होती. तमन्ना भाटियाने हिने HPZ ॲपवर IPL पाहण्याची जाहिरात केली होती. ‘स्त्री 2’ देखील अभिनेत्री दिसली आहे.
आज दुपारी अभिनेत्री ईडी कार्यालयात पोहोचली होती. काही तास अभिनेत्रीची चाैकशी करण्यात आली. हेच नाही तर या प्रकरणात ईडीकडून आतापर्यंत 497.20 कोटी रुपयांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आलीये. HPZ मुळात एक बेटिंग ॲप आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारचे गेम आहेत.
या ॲपच्या माध्यमातून 57 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी दररोज 4 हजार रुपये देण्याचे आश्वासन देऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हैराण करणारे म्हणजे या फसवणुकीसाठी कंपन्यांच्या नावाने वेगवेगळ्या बँकांमध्ये बनावट खाती उघडून गुंतवणूकदारांकडून पैसे हस्तांतरित करण्यात आले. आरोपींनी हे पैसे क्रिप्टो आणि बिटकॉइन्समध्ये गुंतवले.