AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamannaah Bhatia | “माझे आईवडीलसुद्धा असं विचारत नाहीत”; चाहत्याच्या प्रश्नावर भडकली तमन्ना

अभिनेत्री तमन्ना भाटियाने चेन्नईमधल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने चाहत्यांशी मोकळेपणे संवाद साधला. एका चाहत्याने तमन्नाला असा प्रश्न विचारला, ज्यामुळे ती चांगलीच भडकली.

Tamannaah Bhatia | माझे आईवडीलसुद्धा असं विचारत नाहीत; चाहत्याच्या प्रश्नावर भडकली तमन्ना
Tamannaah BhatiaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 10:48 AM

चेन्नई | 6 सप्टेंबर 2023 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतीच ती रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटात झळकली. याशिवाय अभिनेता विजय वर्मासोबतच्या रिलेशनशिपमुळेही ती चर्चेत आहे. या दोघांनी नेटफ्लिक्सवरील ‘लस्ट स्टोरीज 2’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. नुकतीच तमन्नाने चेन्नईमधल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी चाहत्यांशी संवाद साधताना एकाने तिला असा प्रश्न विचारला, ज्यामुळे ती नाराज झाली.

लग्नाबद्दल प्रश्न विचारताच तमन्ना नाराज

एका चाहत्याने तमन्नाला विचारलं, “तू लग्न कधी करणार आहेस? तमिळ मुलांना काही संधी आहे का?” हा प्रश्न ऐकून तमन्ना चांगलीच नाराज झाली. त्या चाहत्याला ती म्हणाली, “माझे आईवडीलसुद्धा मला अशा पद्धतीचा प्रश्न विचारत नाहीत.” नंतर तिला आणखी एका चाहत्याने विचारलं की, तिला कोणी चांगला मुलगा भेटला का? त्यावर तमन्ना म्हणाली, “मी सध्या माझ्या आयुष्यात खूप खुश आहे. होय, मी खूप खुश आहे.”

हे सुद्धा वाचा

तमन्ना – विजयची लव्ह-स्टोरी

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जेव्हा तमन्ना आणि विजय यांचा किसिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी माध्यमांसमोर जाहीरपणे एकमेकांबद्दलचं प्रेम कबुल केलं. विजय आणि तमन्ना आता खुलेपणाने डेट करताना दिसतात. नुकतेच हे दोघं मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते.

विजय आणि तमन्नाने ‘लस्ट स्टोरीज 2’ या नेटफ्लिक्सवरील अँथोलॉजी चित्रपटात एकत्र काम केलं. याच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली. सुरुवातीला दोघांनीही त्याबद्दल मौन बाळगणं पसंत केलं. मात्र नंतर दोघांनीही विविध मुलाखतींमध्ये एकमेकांबद्दलचं प्रेम जाहीरपणे व्यक्त केलं. जीक्यू इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विजय वर्मा म्हणाला होता, “आम्ही दोघं एकमेकांना डेट करतोय. दोघं एकमेकांसोबत खूप खुश आहोत. मी तिच्या प्रेमात अक्षरश: वेडा आहे. माझ्या आयुष्यातील ‘विलेन’चा टप्पा आता संपलेला आहे, आता मी रोमान्सच्या टप्प्यात आहे.”

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.