सुपरस्टार अजित कुमारच्या अपघाताचा व्हिडीओ समोर; नियंत्रण सुटल्याने कार पलटली अन्..

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अजित कुमारच्या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा अपघात झाला होता. अजित कुमारची कार अचानक पलटली अन्..

सुपरस्टार अजित कुमारच्या अपघाताचा व्हिडीओ समोर; नियंत्रण सुटल्याने कार पलटली अन्..
Ajith Kumar Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 10:46 AM

तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अजित कुमारच्या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल! अजित कुमारचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्या अपघाताचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. सुदैवाने अजितला या अपघातात दुखापत झाली नाही आणि तो आता ठीक आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ गेल्या वर्षाचा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अजित कुमार त्याच्या ‘विदा मुयार्ची’ या चित्रपटासाठी अजरबायजान याठिकाणी शूटिंग करत होता. ॲक्शन सीनचं शूटिंग करण्यासाठी अजितने कोणत्याही बॉडी डबलचा वापर केला नव्हता. त्याने स्वत: गाडी चालवून स्टंटचा सीन शूट केला. मात्र त्यादरम्यान त्याची गाडी पलटली.

गुरुवारी अजित कुमारचा पब्लिसिस्ट सुरेश चंद्र याने एक्सवर (ट्विटर) तीन व्हिडीओ पोस्ट केले. हे व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातील एका क्लिपमध्ये पहायला मिळतंय की अजित कार चालवतोय आणि त्याच्या बाजूला ‘बिग बॉस तमिळ’चा स्पर्धक आरव किझार बसलेला आहे. ॲक्शन सीनचं शूटिंग करताना अचानक अजितची कार पलटते. एडिटिंगद्वारे ज्याप्रकारे चित्रपटात दाखवलं जातं की कार दोन-तीन वेळा पलटताना दिसते, त्याप्रकारे या व्हिडीओत अजितची कार पलटते. मात्र हे कोणतंही एडिटिंग नसून खरंच असं घडलं होतं. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती अचानक पलटते आणि तिथे उपस्थित असलेले लोक गाडीच्या दिशेने मदतीसाठी धावून जातात.

हे सुद्धा वाचा

पहा अपघाताचा व्हिडीओ

दुसऱ्या क्लिपमध्ये कारच्या आतील दृश्ये पहायला मिळत आहेत. त्यात कार पलटल्यानंतर अजित आणि आरव आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. हेच व्हिडीओ चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसकडूनही शेअर करण्यात आले आहेत. ‘धाडसाला कोणतीही सीमा नसते. स्टंट सीक्वेन्ससाठी कोणत्याही स्टंट डबलशिवाय (स्टंट करणारी दुसरी व्यक्ती) अजित कुमार यांनी निर्भयपणे शूटिंग केलं आहे’, असं त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. अजित कुमारचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी काळजी व्यक्त केली. वयाच्या 52 व्या वर्षी असे स्टंट्स स्वत:च केल्याबद्दल अनेकांनी अजितचं कौतुकही केलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.