Sushmita Lalit Affair: लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ललित मोदी-सुष्मिता सेनच्या नात्यावर उपस्थित केला प्रश्न; ‘ती पैशांसाठी विकली गेली का?’

ललित मोदी आणि सुष्मिता सेन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आल्यापासून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ललित मोदींनी या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे.

Sushmita Lalit Affair: लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ललित मोदी-सुष्मिता सेनच्या नात्यावर उपस्थित केला प्रश्न; 'ती पैशांसाठी विकली गेली का?'
लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ललित मोदी-सुष्मिता सेनच्या नात्यावर उपस्थित केला प्रश्नImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 4:04 PM

अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि व्यावसायिक ललित मोदी (Lalit Modi) यांनी मालदीवमधील व्हेकेशन फोटोंसह त्यांचं रिलेशनशिप जाहीर करताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. नेटकऱ्यांकडून या नात्याबद्दल विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी ललित मोदी आणि सुष्मिताला ट्रोलही करण्याचा प्रयत्न केला. ललित यांनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं. हे सर्व घडत असतानाच आता लेखिका आणि कार्यकर्त्या तस्लिमा नसरिन (Taslima Nasrin) यांनीसुद्धा ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या नात्याबद्दल पोस्ट लिहिली आहे. सुष्मितासोबतच्या भेटीची आठवण सांगताना तस्लिमा यांनी फेसबुकवर लिहिलं की, “मी सुष्मिता सेनला एकदा कोलकाता विमानतळावर भेटले होते. तिने मला मिठी मारली आणि मला लव्ह यू म्हटलं. तिच्या उंचीने आणि सौंदर्याने मी भारावून गेले होते.”

सुष्मिताचं कौतुक करताना त्यांनी पुढे लिहिलं की, “मला सुष्मिता सेनचं व्यक्तिमत्त्व सर्वात जास्त आवडलं. तिने लहान वयात दोन मुलींना दत्तक घेतलं. तिचा प्रामाणिकपणा, जागरूकता, स्वावलंबन, दृढनिश्चय मला खूप आवडला. पण सुष्मिता आता एका अतिशय अनाकर्षक दिसणाऱ्या व्यक्तीसोबत वेळ घालवत आहे, जो विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेला आहे. कारण तो माणूस खूप श्रीमंत आहे? म्हणून ती पैशाला विकली गेली का? कदाचित ती त्या माणसाच्या प्रेमात आहे. पण ती प्रेमात आहे यावर विश्वास ठेवू इच्छित नाही. जे पैशाच्या प्रेमात पडतात, त्यांच्याबद्दल आदराची भावना माझ्या मनातून खूप लवकर उतरते.”

तस्लिमा नसरीन यांची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

ललित मोदी आणि सुष्मिता सेन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आल्यापासून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ललित मोदींनी या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहित ललित मोदींनी त्यांच्याबद्दल व्हायरल होत असलेल्या फेक न्यूजवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच त्यांनी या पोस्टद्वारे स्वत:ला ट्रोल केल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. “मला वाटतं की आपण अजूनही मध्ययुगात जगत आहोत. दोन व्यक्ती एकमेकांचे चांगले मित्र होऊ शकत नाहीत का? आणि दोघांमुळे केमिस्ट्री चांगली असेल आणि वेळ चांगली असेल तर जादूई पद्धतीने गोष्टी घडू शकतात. माझा सल्ला हाच असेल की जगा आणि इतरांना जगू द्या,” असं त्यांनी लिहिलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.