Irfan Pathan | इरफान पठाणच्या ‘कोब्रा’ चित्रपटाचे टीझर रिलीज…

एकेकाळी भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा इरफान पठाण (Irfan Pathan) ने चित्रपटामध्ये पर्दापण केले आहे

Irfan Pathan | इरफान पठाणच्या 'कोब्रा' चित्रपटाचे टीझर रिलीज...
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 9:17 AM

मुंबई : एकेकाळी भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा इरफान पठाण (Irfan Pathan) ने चित्रपटामध्ये पर्दापण केले आहे. तमिळ चित्रपट ‘कोब्रा’ (Cobra) मध्ये तो आता दिसणार आहे विशेष म्हणजे आता या चित्रपटाचे टीझर रिलीज झाले आहे. इरफानने त्याच्या 36व्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटामध्ये काम करणारा इरफान पठाण पहिला खेळाडू नसून या अगोदर बऱ्याच खेळाडूनी चित्रपट सृष्टीमध्ये आपले नशीब अजमावले आहे.(Teaser release of Irfan Pathan’s ‘Cobra’ movie)

या चित्रपटात इरफान पठाणचे नाव असलन यिलमाझ असेल आणि तो एका तुर्की इंटरपोल अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे 100 सेकंदाच्या टीजरमध्ये इरफानचे जबरदस्त लुक दिसत आहे. या चित्रपटात तमिळ सुपरस्टार चियान विक्रम देखील दिसणार आहे. या चित्रपटात विक्रम मुख्य भूमिकेत आहे, इरफानची छोटी भूमिका साकारणार आहे. चियान विक्रम या चित्रपटात भारतीय हेराची भूमिका साकारत असून, बर्‍याच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात के एस रवी कुमार, श्रीनिधी शेट्टी यांच्यासारखे कलाकार देखील दिसणार आहेत.

35 व्या वर्षीय इरफान पठाणने क्रिकेटला गुडबाय केला होता. इरफानने टीम इंडियाकडून शेवटचा सामना 8 वर्षांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2012 मध्ये खेळला होता. कोलंबोमध्ये टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना इरफानचा शेवटचा सामना ठरला. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. इरफानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली चषकात जम्मू काश्मीरचं प्रतिनिधीत्व केलं होतं. डावखुरा स्विगं गोलंदाज असलेल्या इरफानने 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडिलेड कसोटीतून पदार्पण केलं होतं. डावखुरा स्विंग गोलंदाज म्हणून इरफानने तुफानी कामगिरी करत अल्पावधीतच नावलौकिक मिळवल होत.

संबंधित बातम्या :

Viral Video | नोरा फतेहीच्या डान्सने चाहते घायाळ, नेटवर फक्त नोरा… नोरा…..!

Dhakad | भोपाळच्या गुलाबी थंडीत कुल अंदाजात दिसली कंगना, शूटिंग करतानाचे खास फोटो

(Teaser release of Irfan Pathan’s ‘Cobra’ movie)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.