महाराष्ट्रात मराठी माणसाचा हक्क आणि मराठी भाषेवर स्पष्टच बोलली तेजस्विनी पंडित
Tejaswini Pandit: 'मला आता मराठी भाषा मरताना दिसत आहे आणि...', तेजस्विनी पंडित हिचं मराठी भाषा आणि मराठी माणसांबद्दल मोठं वक्तव्य..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तेजस्विनी पंडित हिच्या वक्तव्याची चर्चा...

Tejaswini Pandit: मराठमोळी अभिनेत्री पंडित कायम तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने महाराष्ट्रात मराठी माणसाचा हक्क आणि मराठी भाषेवर मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय मराठी प्रेक्षक मराठी सिनेमांकडे पाठ फिरवून हिंदी सिनेमांना अधिक प्राधान्य देतात यावर देखील अभिनेत्रीने लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री स्वतःचं मत मांडलं आहे.
अभिनेत्री म्हणाली, ‘भाषेविषयी आपली मोठी समस्या आहे की महाराष्ट्रात मराठी बरोबर हिंदी सुद्धा तितकीच प्रभावी आहे. पण आपण कितीही मराठी मराठी केलं तरी, प्रेक्षक मराठी सिनेमांना नाही तर, हिंदी सिनेमांना अधिक प्राधान्य देतात.’ यावेळी अभिनेत्री आकड्यात मराठी प्रेक्षकांच्या आवडीबद्दल सांगितलं आहे. 100 प्रेक्षकांपैकी फक्त 20 टक्के प्रेक्षक मराठी सिनेमांना प्राधान्य देतात आणि 80 टक्के प्रेक्षकांनी पसंती हिंदी सिनेमांना असते… असं देखील अभिनेत्री म्हणाली.




मला मराठी मरताना दिसत आहे – तेजस्विनी पंडित
मराठी भाषेबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मला आता मराठी भाषा मरताना दिसत आहे आणि ती जगवणं आपलं काम आहे. आपल्या पिढीने पुढच्या पिढीपर्यंत मराठी भाषा पोहोचवली पाहिजे. पुढची पिढी भाषा कितपत सांभाळू शकेल हे आपल्याला माहित नाही, पण मला वाटतं की भाषेचा अभिमान आणि भाषेला प्राधान्य हे आपल्यापैकी प्रत्येकाने दिलं पाहिजे.’
View this post on Instagram
‘आपण महाराष्ट्रात राहतो आपली मातृभाषा मराठी आहे. म्हणून आपण मराठी भाषेला पुढे नेलं पाहिजे.’ एवढंच नाही तर, नोकऱ्यांबद्दल देखील तेजस्विनीने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘नोकरी असेल त्याठिकाणी 80 टक्के लोकं मराठीच असली पाहिजे. मी फार मोठ्या पातळीवर बोलत आहे. पण 65% लोकांना तरी महाराष्ट्रात हक्क मिळाले पाहिजे.’ सध्या सर्वत्र तेजस्विनीने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
तेजस्विनी पंडित हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका बजावर अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनेत्रीचे अनेक सिनेमे चाहते आजही तितक्याच आवडीने पाहातात. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.