राजमाता जिजाबाई भोसले यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट; तेजस्विनी पंडित मुख्य भूमिकेत

गेल्या काही वर्षांपासून ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड यांसारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले. आता अशाच एका ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यामध्ये तेजस्विनी पंडित मुख्य भूमिका साकारणार आहे.

राजमाता जिजाबाई भोसले यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट; तेजस्विनी पंडित मुख्य भूमिकेत
Tejaswini PanditImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 10:16 AM

मुंबई : 12 जानेवारी 2024 | राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले… यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली. पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने स्त्रीशक्ती आणि मातृशक्तिचं चिरंतन उदाहरण सर्वांना दिलं. जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटात जिजाऊंची भूमिका अभिनेत्री तेजस्विनी पंडित साकारणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं असून त्यात राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा दिसत आहे. 6 फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करत आहेत.

हे सुद्धा वाचा

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शिका अनुजा देशपांडे म्हणाल्या, “राजा नंतर घडतो, आधी घडते ती राजमाता. राजमाता जिजाऊसाहेब या लोकजीवनाला जोडणारी अस्मिता तर आहेतच. पण त्याचबरोबर मराठी माणसाला त्याच्या अस्तित्वाची-सामर्थ्याची जाणीव करून देणारी एक शक्ती आहेत . हा अभिमान आणि जाणीव उराशी बाळगून वीरकन्या ते वीरमातेच्या जीवनकाळचे कथानक दोन ते अडीच तासात मांडणं एक लेखिका म्हणून माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. जिजाऊसाहेबांच्या आयुष्यावरील वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट आहे. जिजाऊसाहेबांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व, त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेले प्रसंग-घटना आम्ही प्रेकक्षकांना दाखवणार आहोत.”

“जिजाऊसाहेबांचं व्यक्तिमत्व अभ्यासत आणि लिहित असताना माझ्या डोक्यात सारखा विचार असायचा की, ही असामान्य भूमिका साकारण्यासाठी उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम अभिनय असणारी अभिनेत्री मला हवी होती. तेजस्वीनी एक दर्जेदार अभिनेत्री तर आहेच. शिवाय एक व्यक्ति म्हणून ती प्रेमळ आहे. त्याचसोबत एक उत्तम मार्गदर्शक आणि सहाय्यक आहे. तिच्या कामाप्रती ती खूप समर्पित आणि प्रामाणिक आहे. जिजाऊंचा करारीपणा तिच्यात झळकतो. ती जिजाऊसाहेबांची भूमिका अगदी चोखपणे साकारेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तेजस्विनी पंडित तिच्या भूमिकेविषयी म्हणाली, “ज्या स्त्रीने गुलामगिरीच्या काळोखात जखडलेल्या हिंद प्रांताला स्वतंत्र राज्य – स्वराज्य मिळावं हे स्वप्न पहिल्यांदा पाहिलं, त्यासाठी वर्षानुवर्ष त्या झिजल्या, त्या भूमिकेवर अटल राहिल्या. कुठलीही गोष्ट प्रवाहाच्या विरोधात जाऊन करणं म्हणजेच क्रांती होय. अशा राजमाता स्वराज्य जननी जिजाऊसाहेबांची भूमिका करायला माझी निवड केली याबद्दल मी अनुजाताईंची शतशः आभारी आहे. ही भूमिका करायला मिळणं ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मात्र त्याहून जास्त जबाबदारी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यांना घडवणारी ती माऊली स्वतः निश्चितच त्याच ताकदीची, पराक्रमी, अत्यंत कुशल राजनैतिक आणि मुख्य म्हणजे दूरदृष्टीची असणार यात कसलंच दुमत नाही. अशा या विलक्षण वीरमातेला पडद्यावर साकारणं हे माझं अहोभाग्यच!”

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.