RaanBaazar: ‘समाजाचे सत्य न्यूड स्वरूपात दाखवणे आवश्यकच’, तेजस्विनीच्या आईने शेअर केली खास पोस्ट

या सीरिजमधील अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा त्यातील बोल्ड दृश्यांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यावरून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं, तर काहींनी त्यावरून टीका केली.

RaanBaazar: 'समाजाचे सत्य न्यूड स्वरूपात दाखवणे आवश्यकच', तेजस्विनीच्या आईने शेअर केली खास पोस्ट
Tejaswini Pandit MotherImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 12:21 PM

अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या ‘रानबाजार’ (RaanBaazar) या वेब सीरिजची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. या सीरिजमधील अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा त्यातील बोल्ड दृश्यांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यावरून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं, तर काहींनी त्यावरून टीका केली. आता मराठी कलाकारसुद्धा बोल्ड सीन्स देऊ लागले, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी निशाणा साधला. आजपासून (20 मे) ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर यांनी याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. रानबाजारमधील बोल्ड सीन्सवरून अभिनेत्रींवर टीका करणाऱ्यांना चपराक लावणारी एक पोस्ट प्रेक्षकाने लिहिली. तीच पोस्ट ज्योती यांनी शेअर केली आहे.

प्रेक्षकाची पोस्ट-

‘रानबाजार वेब सीरिजवरून जे रान उठले आहे, त्यावरून लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. बोल्ड सीन आणि जरा भडक भाषेने इतके भेदरून जायचे मुळात कारण काय? ज्यांनी नामदेव ढसाळांचा गोलपिठा हा काव्यसंग्रह वाचला असेल, ज्यांना देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या स्थितीबद्दल नीट कल्पना असेल त्यांना रानबाजारसारख्या सीरियल अगदी मामुली वाटतील. त्यातील अभिनेत्रींनी जी काही कथित धाडसी दृश्ये दिली आहेत त्यापेक्षा अधिक उत्तेजक असे बरेच काही इंटरनेटवर सहजी उपलब्ध असते. आणि ते कोण कोण पाहाते याबद्दल बेधडकपणे लिहिले तर अनेकांची भारतीय संस्कृती लगेच डळमळीत होईल. रानबाजार वेब सिरीयल दिग्दर्शित करणारे, ती लिहिणारे तुमच्या आमच्यासारखेच चांगल्या घरातील आहेत आणि त्यात अभिनय करणारेही कोणी उठवळ नाहीत. रानबाजार ही एक कलाकृती आहे. त्याकडे तसेच पाहिले पाहिजे. उगाच अनेक लोक स्वतः आयुष्यात पाळत नसलेल्या मूल्यांचे समाज माध्यमावर स्तोम माजवत बसतात तेंव्हा त्यांची शरम वाटते. जगात जे गलिच्छ असते असे मानले जाते ती आपल्याच समाजाची घाण असते. ती स्पष्टपणे दाखवणे यात काहीही चूक नाही. रानबाजार असे त्या मालिकेचे नाव असले तरी खरे नाव त्यामुळे प्रत्येकाच्या मनात येतेच. इथूनच त्या मालिकेच्या यशाला सुरूवात होते. समाजाचे सत्य न्यूड स्वरूपात दाखवणे सध्याच्या काळात तर आवश्यकचआहे. कारण नको त्या गोष्टी तकलादू मूल्यांच्या पदरात लपवून ठेवणाऱ्या लोकांना सध्या सोन्याचे दिवस आलेत. त्यामुळे रानबाजारला विरोध होणे स्वाभाविकच. पण या मालिकेला एक प्रेक्षक म्हणून माझा निर्विवाद पाठिंबा आहे,’ अशी पोस्ट समीर परांजपे यांनी लिहिली.

हे सुद्धा वाचा

हीच पोस्ट शेअर करत ज्योती चांदेकर यांनी पुढे लिहिलं, ‘प्रिय समीर, मी तुम्हाला प्रत्यक्षात ओळखत नाही पण एक प्रेक्षक म्हणून आणि मुख्य म्हणजे एक आई म्हणून अगदी योग्य शब्दात तुम्ही माझ्या भावनांची मांडणी केलीत. धन्यवाद आणि आशिर्वाद. एक खरी आणि धाडसी वेब मालिका केल्याबद्दल एक मराठी रसिक प्रेक्षक म्हणून अभिजीत पानसे यांचे अभिनंदन.’

ज्योती चांदेकर यांची पोस्ट-

राजकारण, त्यातील धूर्त डावपेच, हनी ट्रॅप, उत्कंठा, नाट्यमय थरार हे सगळंच या सीरिजच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळतं. यामध्ये तेजस्विनी आणि प्राजक्तासोबतच उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे आणि अभिजीत पानसे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.