Aai Kuthe Kay Karte | ‘या घरात राहण्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही!’, अरुंधतीचा संजनाला सज्जड दम!

'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या मनोरंजक वळणावर आली आहे.  अरुंधतीच्या दबावानंतर अनिरुद्धने संजनाशी लग्न केलं. घरच्यांचा या सगळ्याला विरोध असतानाही हे लग्न आता पार पडले आहे. आता संजना देशमुख कुटुंबात गृह्प्रवेशाची तयारी करत आहे.

Aai Kuthe Kay Karte | ‘या घरात राहण्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही!’, अरुंधतीचा संजनाला सज्जड दम!
आई कुठे काय करते
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 4:12 PM

मुंबई : ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या मनोरंजक वळणावर आली आहे.  अरुंधतीच्या दबावानंतर अनिरुद्धने संजनाशी लग्न केलं. घरच्यांचा या सगळ्याला विरोध असतानाही हे लग्न आता पार पडले आहे. आता संजना देशमुख कुटुंबात गृह्प्रवेशाची तयारी करत आहे. दोघांची वरात देशमुखांच्या समृद्धी बंगल्यात आली आहे. संजना माप ओलांडणार इतक्यात अनिरुद्धची आई या दोघांना गरात येण्यापासून रोखते. याचवेळी झालेल्या तु-तु-मै-मै दरम्यान आईंना चक्कर येते. इतक्यात अनिरुद्ध गळ्यातील हार काढून आईकडे धाव घेतो. इतक्यात बाहेर उभी असलेली अरुंधतीदेखील धावत आत येते आणि तिच्या पायाने ते माप ओलांडले जाते. यामुळेच आता लग्न जरी संजनाचं झालं असलं तरी, गृहप्रवेश मात्र पुन्हा अरुंधतीचाच झाला आहे.

अनिरुद्धची आई रुग्णालयात दाखल

संजनाच्या गृहप्रवेशाच्या वेळी झालेल्या वादानंतर अनिरुद्धच्या आईला स्ट्रोक आला आहे. रक्तदाब प्रचंड वाढल्याने त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. यावेळी तातडीने रुग्णवाहिका बोलावून देशमुख कुटुंबाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी घरी निघून चालेली अरुंधतीची पावले पुन्हा ‘समृद्धी’कडे वळली आहेत. आई आजारी असताना आता पुन्हा अरुंधती देशमुखांच्या घरात थांबणार आहे.

आई परत आल्या की मी त्यांना सगळं त्यांच्या आवडीचं करून देणार आहे, असं अरुंधती विमलला सांगते. मात्र, त्यावर विमल तिला त्यासाठी तुम्ही घरात राहायला हवं, असं म्हणते. यावर आता अरुंधती काय निर्णय घेणार आणि ती पुन्हा ‘समृद्धी’तच नांदणार का? असे आणि अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मानत निर्माण झाले होते. यावर यात अप्पांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

अरुंधतीच होणार ‘समृद्धी’ची मालकीण

संजना घरात आल्यानंतर आता अप्पांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने देशमुखांच्या कुटुंबात राहावं, ती इथे राहिल्यानेच घरात शांतता नांदेल, असा विचार करणाऱ्या अप्पांनी देशमुखांचा ‘समृद्धी’ बंगला आता अनिरुद्ध आणि अरुंधती या दोघांच्याही नावावर समान वाटला आहे. अर्थात आता अरुंधती देखील या अर्ध्या घराची मालकीण झाली आहे. त्यामुळे आता ती पुन्हा एकदा देशमुखांच्याच घरात राहणार आहे.

संजनाला भरणार सज्जड दम

मालिकेच्या पुढच्या भागात आता अरुंधती संजनाला चांगलाच दम भरताना दिसणार आहे. सकाळची काम उरकण्यासाठी अरुंधतीची लगबग सुरु असते. यावेळी ती अनिरुद्धच्या बेडरूम जवळ येते. आणि अचानक त्याचवेळी अनिरुद्ध देखील दरवाजा उघडतो. त्यावेळी संजना तिला तू मुद्दाम आमच्या बेडरूमला कान लावून ऐकत होतीस, असं म्हणते. त्यावर अप्पांनी हे घर माझ्यानावावर देखील केलं आहे, असं म्हणत, या घरात राहण्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही!, असा दम अरुंधती संजनाला भरते. यानंतर आता देशमुखांच्या घरात अरुंधती विरुद्ध संजना असा नवीन संघर्ष पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

पायल रोहतगीच्या वकिलाने अभिनेत्रीविरोधात एफआयआर नाकारला, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन अभिनय विश्वात आला, वाचा अभिनेता किच्चा सुदीपच्या काही खास गोष्टी

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.