Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-आशुतोषच्या ड्युएट गाण्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस, पहा Video

आशुतोषसोबत अरुंधती ड्युएट गाणं रेकॉर्ड करत असताना स्टुडिओमध्ये यश आणि गौरी त्यांच्यासोबत आहेतच. पण चक्क अनिरुद्धसुद्धा तिथे पोहोचला आहे. अनिरुद्धला पाहून क्षणभरासाठी अरुंधती डगमगते.

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-आशुतोषच्या ड्युएट गाण्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस, पहा Video
Aai Kuthe Kay KarteImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 2:47 PM

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या चाहत्यांना ज्या गोष्टीची उत्सुकता होती, अखेर नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये ते पहायला मिळालं. अरुंधती (Arundhati) आणि आशुतोष (Ashutosh) यांनी स्टुडिओमध्ये एकत्र गाणं रेकॉर्ड केलं. या गाण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून होती, अखेर ते गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘सोबतीस हलके सावलीस ऊन, भोवती तशीही मोरपीस खूण..’ असे या गाण्याचे बोल आहेत. आशुतोषसोबत अरुंधती ड्युएट गाणं रेकॉर्ड करत असताना स्टुडिओमध्ये यश आणि गौरी त्यांच्यासोबत आहेतच. पण चक्क अनिरुद्धसुद्धा तिथे पोहोचला आहे. अनिरुद्धला पाहून क्षणभरासाठी अरुंधती डगमगते, पण निलेशने सूचना दिल्यानंतर ती पुढे गाणं चालू ठेवते. स्टार प्रवाह वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.

मालिकेत सध्या अरुंधतीचा स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रवास सुरु आहे. गाण्यावर अरुंधतीचं विशेष प्रेम आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना तिची ही आवड मागे पडली. मात्र आता अरुंधतीने आपलं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केलाय. मालिकेत अरुंधतीचं दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात अरुंधतीला आशुतोषचीही साथ मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

‘सोबतीस हलके, सावलीस ऊन… भोवती तशी ही, मोरपीस खूण… दोन काठ अपुले, ऐल आणि पैल, ऐन सांजवेळी, बंध होई सैल… बंधनाविना रे ही, गुंतणारी वीण, हा प्रवास आता, तुझ्यावीण कठीण… वादळात कोणत्याही, हाक दे कधीही, हात देत हाती, मी तिथे असेन…’ असे गाण्याचे शब्द असून श्रीपाद जोशींनी हे गाणं लिहिलं आहे. तर मंदार आपटे आणि विद्या करलगिकर यांनी हे गाणं गायलं आहे. निलेश मोहरीरने हे गाणं संगीतबद्ध केलं असून या गाण्याच्या विशेष भागातही तो झळकला आहे. खास बात म्हणजे या गाण्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असून या गाण्याला एकत्रितपणे १ मिलियनपेक्षा जास्त व्हूज मिळाले आहेत.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अरुंधतीला न विचारता अनिरुद्ध स्टुडिओमध्ये आल्यामुळे तिचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे ती स्टुडिओबाहेर पडताच अनिरुद्धला सुनावते. “माझ्यासाठी हे सगळं का करताय, ईशा आणि अभिला आता हे दाखवायचंय का की तुम्ही आता किती समजूतदारपणा दाखवताय, मी परत यावं यासाठी प्रयत्न करताय, धडपड करताय आणि दुष्टपणे वागतेय असा प्रयत्न चाललाय का तुमचा”, असे सवाल ती अनिरुद्धला विचारते. काहीही झालं तरी मी कधीही तुमच्याकडे परत येणार नाही असंही ती स्पष्टपणे चांगले. या सर्व घडामोडी प्रेक्षकांना बुधवारच्या एपिसोडमध्ये पहायला मिळतील.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.