AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अबोली मालिकेने गाठला १०० भागांचा टप्पा; उदय टिकेकर यांची होणार धमाकेदार एण्ट्री

स्टार प्रवाह (Star Pravah Serial) वाहिनीवरील अबोली (Aboli) मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिकेचा यापुढील प्रवासही तितकाच उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असेल.

अबोली मालिकेने गाठला १०० भागांचा टप्पा; उदय टिकेकर यांची होणार धमाकेदार एण्ट्री
उदय टिकेकरांच्या धमाकेदार एण्ट्रीची चाहत्यांना उत्सुकताImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 7:43 PM

स्टार प्रवाह (Star Pravah Serial) वाहिनीवरील अबोली (Aboli) मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे मालिकेने नुकताच 100 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिकेचा यापुढील प्रवासही तितकाच उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असेल. मालिकेत सध्या अबोलीच्या आयुष्यात बरीच उलथापालथ सुरू आहे. प्रतापरावांकडून झालेल्या अपमानानंतर अंकुशने अबोलीला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. राहायला कुठेच आसरा नसल्यामुळे अबोलीने मंदिरात राहण्याचं ठरवलं आहे. अश्यातच मालिकेत डीसीपी किरण कुलकर्णी यांची एण्ट्री होणार आहे. अबोलीला पुन्हा अंकुशच्या घरात प्रवेश मिळावा यासाठी किरण कुलकर्णी प्रयत्न करतील का हे पाहणं उत्सुकतेचं असेल. (Marathi Serial)

सुप्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर किरण कुलकर्णी हे पात्र साकारणार आहेत. या पात्रविषयी सांगताना उदय टिकेकर म्हणाले, “स्टार प्रवाहसोबत माझं खूप जुनं नातं आहे अगदी अग्निहोत्र पासून. अबोली मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा योग जुळून आला आहे. किरण कुलकर्णी हे पात्र अतिशय संवेदनशील आणि प्रेमळ आहे. त्याच्या येण्याने मालिकेत नेमकं काय घडणार याचा उलगडा होईलच पण हे पात्र प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.” अबोली ही मालिका रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

मालिकेच्या शीर्षकाप्रमाणेच ही गोष्ट अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची आहे. अभिनेत्री गौरी कुलकर्णी अबोली ही व्यक्तिरेखा साकारतेय. अबोली ही अतिशय साधी मुलगी आहे. नावाप्रमाणेच अबोल, कमी बोलणारी. तिचं असं वेगळं जग आहे ज्यात ती रमते. खरंतर तिला तिचं म्हणणं मांडायचं असतं मात्र तिला ते मांडू दिलं जात नाही. गौरीसोबतच सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव, अपर्णा अपराजित, अंगद म्हस्कर, दीप्ती लेले अशी दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे.

हेही वाचा:

आलियाच्या अंगठीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; काय आहे असं खास?

The Kashmir Files मध्ये क्रूरतेची हद्द पार करणारा ‘बिट्टा’ कोण आहे? जो म्हणाला, “आईलाही मारू शकतो”

हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक.
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?.
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'.
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक.
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?.
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर.
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन.