Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ये रिश्ता क्या…’ फेम अभिनेता करण मेहराला रात्रभर खावी लागली तुरुंगाची हवा, पत्नीने दाखल केली होती तक्रार!

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या प्रसिद्ध मालिकेमधील ‘नैतिक’ म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) याला घरगुती वाद प्रकरणात काल (31 मे) अटक करण्यात आली होती. रात्रभर पोलीस ठाण्यात राहिल्यानंतर, आता त्याला जामीन मिळाला आहे.

‘ये रिश्ता क्या…’ फेम अभिनेता करण मेहराला रात्रभर खावी लागली तुरुंगाची हवा, पत्नीने दाखल केली होती तक्रार!
करण आणि निशा मेहरा
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 10:52 AM

मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या प्रसिद्ध मालिकेमधील ‘नैतिक’ म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) याला घरगुती वाद प्रकरणात काल (31 मे) अटक करण्यात आली होती. रात्रभर पोलीस ठाण्यात राहिल्यानंतर, आता त्याला जामीन मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, ते सध्या अभिनेत्याशी बोलत आहेत. अभिनेता करण आणि निशा यांच्या नात्यातील तणावाच्या बातम्या मागील बर्‍याच काळापासून कानावर येत आहेत, पण आता असं दिसून येत आहे की ही समस्या बरीच वाढली आहे (Actor Karan Mehra arrested after his wife & actor Nisha Rawal filed a complaint).

काही घरगुती वादानंतर करणची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावळ (Nisha Rawal) हिनेच करणच्या विरोधात गोरेगाव परिसरात फिर्याद दिली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या दोघांत प्रत्यक्षात काय घडले याविषयी चौकशी सुरू असून, लवकरच सर्व प्रकार समोर येईल. तसेच चाहतेदेखील दोघांच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा करत आहेत.

तसे, दोघांमध्ये बर्‍याच दिवसांपासून वाद निर्माण होत असल्याची बातमी चर्चेत आहे. असे म्हटले जात होते की, हे दोघेही एकमेकांना पूर्ण वेळ देऊ शकत नाहीयत, यामुळे दोघांच्या नात्यात दरी निर्माण झाली आहे. परंतु या दोघांनीही अशा वृत्तांना नेहमीच फेटाळून लावले होते.

नाते तुटल्याच्या चर्चेवर करणची प्रतिक्रिया

अलीकडे या विषयावर बोलताना करण म्हणाला की, काही दिवस त्याची तब्येत ठीक नव्हती आणि दरम्यान कानावर येणाऱ्या वाईट बातम्यांमुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. तो म्हणाला की, ‘मला बरे वाटत नाहीय, मी शारीरिकदृष्ट्या खूप अशक्त झालो आहे आणि या दरम्यान माझ्या बऱ्याच जवळच्या लोकांचे नुकतेच निधन झाले. ज्यामुळे मी अधिक चिंताग्रस्त झालो आहे. अशा परिस्थितीत मी माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी येणाऱ्या या बातम्यांमुळे आणखी अस्वस्थ झालो होतो. मला याबद्दल बोलण्याची इच्छा नव्हती, परंतु आता मला समोर येऊन बोलणे आवश्यक आहे. पत्नी निशाच सध्या माझी पूर्ण काळजी घेत आहे.’(Actor Karan Mehra arrested after his wife & actor Nisha Rawal filed a complaint)

करणला अटक :

करणची कारकीर्द

तब्बल सात वर्ष करण ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. यात त्याने नैतिक सिंघानियाची भूमिका साकारली होती. शोमध्ये तो अभिनेत्री हिना खानसोबत दिसला होता. करण मेहरा या शोमधून प्रचंड हिट ठरला होता. सध्या या शोमध्ये मोहसीन खान आणि शिवांगी जोशी मुख्य भूमिका साकारत आहेत. करण मेहराने बिग बॉस 10 मध्येही भाग घेतला होता. गेले काही दिवस करण आपल्या आगामी पंजाबी प्रोजेक्टमध्ये व्यस्त होता आणि निशा आपल्या मुलासमवेत मुंबईत होती. 2012 साली निशा आणि करणचे लग्न झाले. यानंतर, 2017 मध्ये हे दांपत्य एका मुलाचे पालक बनले.

(Actor Karan Mehra arrested after his wife & actor Nisha Rawal filed a complaint)

हेही वाचा :

Kundali Bhagya : कोण आहे श्रद्धा आर्या?, कुंडली भाग्य मालिकेनं दिली खास ओळख…

Breakup Story | विवाहित अभिनेत्यावर भाळली होती तब्बू, अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ‘या’ कारणामुळे तुटले नाते!

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.