TMKOC | ‘दयाबेन’ साकारण्यासाठी ‘खतरों के खिलाडी’च्या ‘या’ अभिनेत्रीला ऑफर! पाहा काय म्हणाली अभिनेत्री…

मीडिया रिपोर्टनुसार, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या एका टीव्ही मालिकेत दिव्यांका त्रिपाठी-दहियाला ‘दयाबेन’च्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. तथापि, तिने ही ऑफर नाकारली आहे. याबाबत अद्याप दिव्यांका त्रिपाठी-दहियाकडून कोणतेही निवेदन आले नसले, तरी दिव्यांका या वृत्ताची नक्कीच पुष्टी करेल.

TMKOC | ‘दयाबेन’ साकारण्यासाठी ‘खतरों के खिलाडी’च्या ‘या’ अभिनेत्रीला ऑफर! पाहा काय म्हणाली अभिनेत्री...
दयाबेन
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 10:30 AM

मुंबई : अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) स्टारर टीव्ही शो ‘अनुपमा’ ही मालिका आजकालची टीव्हीवरची सर्वात लोकप्रिय मालिका मानली जाते. परंतु, या आधी देखील एका मालिकेने अशी लोकप्रियता मिळवली होती. एक काळ असा होता की ‘ये है मोहब्बतें’ हा टीव्ही शो टीआरपीचा झेंडा फडकावत होता आणि या कार्यक्रमाची मुख्य अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी-दहियाला (Divyanka Tripathi) घरोघरी लोकप्रियता मिळाली होती. दिव्यांका ही सध्या केपटाऊनमध्ये असून ‘खतरों के खिलाडी 11’ या शोची शूटिंग करत आहे (Actress Divyanka Tripathi gets offer for TMKOC Dayaben Character).

दिव्यांका ‘तारक मेहता..’मध्ये काम करणार?

दरम्यान, दिव्यांकाशी संबंधित एक रंजक माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या एका टीव्ही मालिकेत दिव्यांका त्रिपाठी-दहियाला ‘दयाबेन’च्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. तथापि, तिने ही ऑफर नाकारली आहे. याबाबत अद्याप दिव्यांका त्रिपाठी-दहियाकडून कोणतेही निवेदन आले नसले, तरी दिव्यांका या वृत्ताची नक्कीच पुष्टी करेल.

दिशा वाकानीने सोडली मालिका?

या वृत्ताची चर्चा अशा वेळी आली आहे, जेव्हा दिशा वाकानीच्या शोमध्ये परतण्याबद्दल बर्‍याच गोष्टी सतत बोलल्या जात आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील दिशा वाकानीची व्यक्तिरेखा शोमधील एक यशस्वी आणि प्रसिद्ध पात्रांपैकी एक आहे. दिशा वाकानी शोमध्ये दयाबेनची व्यक्तिरेखा साकारत आहे, जिची बोलण्याची शैलीपासून गमतीदार अभिव्यक्तींपर्यंत प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना आवडली आहे.

दिव्यांका त्रिपाठी सध्या ‘खतरों के खिलाडी सीझन 11’ शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शोमध्ये दिव्यांका कशी कामगिरी करेल हे वेळोवेळी स्पष्ट होईल. पण ती या शोमध्ये येताच या शोची मागणी आणि लोकप्रियता दोघांमध्येही वाढ झाली आहे.

‘तारक मेहता…’चे निर्माते म्हणतात…

एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत असित मोदी यांना ‘दया बेन’ यांच्या परतीबद्दल प्रश्न विचारले गेले. त्यावर ते म्हणाले की, ‘मला वाटते की आता मीच दयाबेन झाले पाहिजे. अनेक वर्षांपासून दयाबेन यांच्या परतीबद्दल प्रश्न विचारण्यात येत आहेत.’ असित मोदी म्हणाले की, निर्माते दिशा वाकानीच्या परत येण्याची वाट पाहत आहेत, पण जर अभिनेत्रीने शो सोडण्याची इच्छा व्यक्त केली तर शो नवीन दयाबेन सोबत पुढे जाईल. आम्ही अजूनही तिच्या परतीच्या प्रतीक्षेत आहोत.’

असित मोदी पुढे म्हणाले की, पण यावेळी मला वाटते असे की, दया बेनची वापसी आणि पोपटलाल यांचे लग्न हे फार महत्वाचे नाही. या साथीच्या आजारात आणखी बऱ्याच मोठ्या समस्या उद्भवत आहेत, ज्याकडे लक्ष देणे या वेळी फार महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, यावेळी आपल्याला सेफ्टी प्रोटोकॉल आणि शूटची विशेष काळजी घ्यावी लागेल जेणेकरून याचा परिणाम कोणाच्याही दैनंदिन जीवनात होणार नाही. तसेच, बायो बबल योग्य असल्यास, प्रभावी असल्यास आम्हाला त्या स्वरूपात काम करण्यास आवडेल.

(Actress Divyanka Tripathi gets offer for TMKOC Dayaben Character)

हेही वाचा :

Samantar : एकाचे कर्म, दुसऱ्याचे भविष्य, नियती नियंत्रित होईल? कसा असेल कुमारचा ‘समांतर’ प्रवास?

Films on OTT | ओटीटी प्लॅटफार्मवर मनोरंजनाची मेजवानी, आठवड्यात प्रदर्शित ‘या’ वेब सीरीज आणि फिल्म्स!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.