‘ते’ खास फोटो शेअर करत प्राजक्ता माळी म्हणाली, ‘जुळून येती रेशीमगाठी’ 11 वर्षे…

Actress Prajkta Mali Post : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील खास क्षण प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसंच या फोटोंना कॅप्शनही खूपच खास दिलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

'ते' खास फोटो शेअर करत प्राजक्ता माळी म्हणाली, 'जुळून येती रेशीमगाठी' 11 वर्षे...
प्राजक्ता माळी, अभिनेत्रीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 3:37 PM

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते. नुकतंच ‘फुलवंती’ हा प्राजक्ताचा सिनेमा प्रदर्शित झाला. तिने अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. मागच्या 11 वर्षांपासून प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीत काम करत आहे. याच सगळ्या प्रवासाबद्दल प्राजक्ता माळी व्यक्त झाली आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही तिची मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील मेघना हे तिचं पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेबद्दल आणि तिच्या करिअरबद्दल प्राजक्ता माळी हिने एक पोस्ट शेअर केली आहे.

प्राजक्ता माळी ही मागच्या 11 वर्षांपासून प्राजक्ता सिनेसृष्टीत काम करत आहे. ‘फिरूनी नवी जन्मेन मी’ या मालिकेतून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. गुडमोर्निंग महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र या कार्यक्रमांचं प्राजक्ताने सूत्रसंचालन केलं. आता ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. या शोमधील ‘वाह दादा वाह’ हा तिचा डायलॉग चर्चेत आहे. ‘फुलवंती’ हा तिचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा लोकप्रिय ठरला. प्रेक्षकांनी या सिनेमाना भरभरून प्रतिसाद दिला आहे.

प्राजक्ता माळीची पोस्ट

१- फिरूनी नवी जन्मेन मी – मी मराठी २- सुवासिनी – स्टार प्रवाह ३- नकटीच्या लग्नाला यायचं हं! – झी मराठी

४- सुगरण – साम मराठी (निवेदन) ५- गाणे तुमचे आमचे – ई टिव्ही मराठी – (निवेदन) ६- गुडमोर्निंग महाराष्ट्र – झी मराठी – (निवेदन) ७- मस्त महाराष्ट्र – – Livjng foods आणि झी मराठी (travel anchor) ८- महाराष्ट्राची हास्यजत्रा – सोनी मराठी . गेली १३ वर्ष कला मनोरंजन क्षेत्रात काम करतेय. ह्या वर्षांमध्ये टिव्ही जगतात वरील projects केले; पण “जुळून येती रेशीमगाठी” वर प्रेक्षकांचं असणारं प्रेम काही औरच आहे. #specialproject . काल ह्या मालिकेला सुरू होऊन ११ वर्ष झाली. #timeflies

११ वर्षात इतर अनेक चित्रपट- मालिका येऊनही रेशीमगाठी कधी झाकोळली गेली नाही. आजही लोक मालिकेचं नाव घेऊन कौतूक करतात. प्रेमाचा वर्षाव चालूच आहे. हेच ह्या मालिकेचं खरं यश. हीच प्रेक्षकांची नी आमची #रेशीमगाठ . ही मालिका माझ्या पदरात पडली ह्याकरता देवाचे मानू तेवढे आभार कमीच.., #कृतज्ञ #prajakttamali #११

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.