अद्वैत दादरकर म्हणतोय ‘सोहम कुलकर्णी मला तुझी आठवण येईल…’, ‘अग्गंबाई सूनबाई’ अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेणार!

काही काही महिन्यांपूर्वीच सुरु झालेली ‘अग्गबाई सूनबाई’ (Aggabai Sunbai) ही मालिका देखील अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत ‘बबड्या’ अर्थात ‘सोहम कुलकर्णी’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता अद्वैत दादरकर (Adwait dadrkar) याने पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.

अद्वैत दादरकर म्हणतोय ‘सोहम कुलकर्णी मला तुझी आठवण येईल...’, ‘अग्गंबाई सूनबाई’ अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेणार!
अद्वैत दादरकर
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 1:10 PM

मुंबई : प्रेक्षकांच्या लाडक्या असणाऱ्या बहुतेक सर्वच मालिका आता निरोप घेताना दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेल्या काही मालिका आता ऑफ एअर जाणार आहेत.  या  मालिकांची जागा आता नव्या मालिका घेणार आहे. काही काही महिन्यांपूर्वीच सुरु झालेली ‘अग्गबाई सूनबाई’ (Aggabai Sunbai) ही मालिका देखील अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत ‘बबड्या’ अर्थात ‘सोहम कुलकर्णी’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता अद्वैत दादरकर (Adwait dadrkar) याने पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.

‘सोहम कुलकर्णी मला तुझी नेहमीच आठवण येईल…’ असं म्हणत अद्वैतने आपला ‘सोहम कुलकर्णी’ म्हणून शेवटचा सीन सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पाहा पोस्ट :

अद्वैतची पोस्ट त्याच्याच शब्दांत :

‘माझ्या Character चा Last Shot.I will miss you Soham Kulkarni. आयुष्यात पहिल्यांदा Negative Role. सगळेच अनुभव आले..प्रचंड Trolling,negative reactions.. बरोबर खूप कौतुक आणि प्रेम सुद्धा… दुष्ट माणूस स्वतः साठी कधीच दुष्ट नसतो..लोकांसाठी असतो..त्यामुळे मुद्दाम दुष्ट पणा play न करता..समाजाच्या दृष्टीने चुकीची मतं..तत्व आणि वागणं असलेला ‘माणूस’ करण्यावर भर दिला..I like being a villain. Villains are more exciting. Judd Nelsonचं हे म्हणणं जास्त पटलं..खरंच माझ्या comfort zone च्या बाहेर जाऊन काम करता आलं..thank you so much.. @zeemarathiofficial @sunilvasantbhosale निर्माता @sojalsawant, रेणुका, सिद्धार्थ @karajgar_uttara मला ही संधी दिल्या बद्दल… Thank You @masala.chai सोहम निर्माण केल्या बद्दल.. @jp_insta_jp तुझी खूप मदत झाली सोहम समजून घेण्यात.. @nivedita_ashok_saraf @drgirishoak @mohanjoshiofficial तुम्हा तिघांबरोबर काम करणं खरंच मला ॲक्टर म्हणून ग्रो करणारं होतं..@gitanjaleeganage तुला inhibitions नसल्या मुळे आणि स्वतः ला कमाल carry केल्याने आपले सिन work झाले..नाहीतर अश्या प्रकारचे सीन करणं अवघड जातं..thank you.

@uma_hrishikesh_official आपले सीन्स करणं सर्वात अवघड होतं माझ्यासाठी..कारण आपल्या संपूर्ण टीम मध्ये सर्वात चांगलं bonding आणि मैत्री तुझ्याशी झाली पण On screen ते दिसणं अपेक्षित नव्हतं..त्यामुळे तुझ्या बद्दल तिरस्कार..द्वेष..मत्सर आणणं हे ॲक्टर म्हणून challenging होतं..पण आपलं action reaction च tuning उत्तम जमलं..म्हणून शक्य झालं..( लालितकलादर्श पणा जपून ठेव )

@bhakti_ratnaparkhi आपले जेवढे सीन्स झाले त्यात खूप मज्जा आली..सगळ्यांबद्दल बोलणं शक्य नाही..@anvithardikar_official मज्जा आली..पण @bhaktiisatam @sarveshghadi1902 आम्हाला सहन केल्या बद्दल आणि तुमच्या मेहनती बद्दल खरंच thank you. नितीन काटकर, सुर्या,mahadiiiiiik.. आता सगळ्यांची नावं घेत नाही.. अगं बाई सूनबाई च्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार..शेवटचे काही भाग आता उरले आहेत..नक्की पहा अग्गंबाई सूनबाई ८.३० वाजता झी.मराठीवर.’

हेही वाचा :

‘कमिंग बॅक होम वाली फीलिंग’, ‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळेचं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन!

Rajeshwari Kharat : ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरातच्या घायाळ करणाऱ्या अदा, हे फोटो पाहाच

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....