Shiv Thakare | आकांक्षा पुरी हिने केला शिव ठाकरे याच्यावर प्रेमाचा वर्षाव, थेट म्हटले स्वीटहार्ट
आकांक्षा पुरी ही शिव ठाकरे याला डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहेत. शेवटी आता यावर आकांक्षा पुरी हिने मोठे भाष्य केले आहे. आकांक्षा पुरी हिने शिव ठाकरे याच्याबद्दल केलेले विधान ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.
मुंबई : शिव ठाकरे हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शिव ठाकरे (Shiv Thakare) याने जबरदस्त गेम हा बिग बाॅसमध्ये खेळला. एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यानंतर शिव ठाकरे याने त्याला उचलून घेत आनंद व्यक्त केला. इतकेच नाही तर बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) मध्ये खरी मैत्री ही बघायला मिळालीये. शिव ठाकरे, साजिद खान, एमसी स्टॅन, सुंबुल ताैकीर, निम्रत काैर आणि अब्दू रोजिक (Abdu Rozik) यांची मैत्री शेवटपर्यंत टिकली. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चात रंगत होती की, निम्रत काैर हिला शिव ठाकरे हा डेट करत आहे. मात्र, या पूर्वीच निम्रत काैर हिने स्पष्ट केले की, आम्ही खूप जास्त चांगले मित्र आहोत.
शिव ठाकरे याला काही दिवसांपूर्वी दोन मराठी चित्रपटांच्या आॅफर होत्या. मात्र, शिव ठाकरे याने हे चित्रपट करण्यास नकार दिलाय. इतकेच नाही तर शिव ठाकरे हा रोहित शेट्टी यांचा शो खतरो के खिलाडीमध्ये धमाल करताना दिसणार आहे. फक्त शिव ठाकरे हाच नाही तर अर्चना गाैतम देखील या शोमध्ये सहभागी होणार आहे.
शिव ठाकरे आणि आकांक्षा पुरी हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सतत रंगताना दिसत आहे. शेवटी यावर एका मुलाखतीमध्ये आकांक्षा पुरी हिने भाष्य केले आहे. आकांक्षा पुरी म्हणाली की, शिव ठाकरे हा खूप जास्त चांगला मुलगा आहे. इतकेच नाही तर थेट आकांक्षा पुरी ही शिव ठाकरे याला स्वीटहार्ट असल्याचे देखील म्हटले आहे.
आकांक्षा पुढे म्हणाली की, माझ्याबद्दल आणि शिवबद्दल ज्याकाही चर्चा सुरू आहेत, त्याचे मला हसू येते. ज्याकाही चर्चा सुरू आहेत, त्यामध्ये एकही टक्का सचाई नाहीये. शिव खूप जास्त चांगला आहे तो स्वीटहार्ट आहे. पण इतका चांगला मुलगा माझ्या नशिबात नाहीये. मीका सिंहच्या स्वंयवरची विजेती ही आकांक्षा पुरी ही आहे.
पारस छाबडा याला देखील काही वर्ष आकांक्षा पुरी हिने डेट केले आहे. मात्र, बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यानंतर पारने तिला सोडले, त्यानंतर आकांक्षा पुरी हिने मीडियासमोर येत पारसवर काही गंभीर आरोप केले. त्यानंतर आकांक्षा पुरी ही मीका सिंह याच्यासोबत लग्न करणार असल्याची देखील जोरदार चर्चा रंगताना दिसत होती.