Shiv Thakare | शिव ठाकरे याच्या प्रेमात पडली एअर होस्टेस, थेट आई शपथ म्हणत दिली चिठ्ठी आणि पुढे…
अनेकदा बिग बाॅसच्या घरात असताना एमसी स्टॅन म्हणायचा की, माझा भाऊ शिव ठाकरे हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला पाहिजे. शिव ठाकरे हा बिग बाॅस 16 चा सेकेंड रनरअप ठरला आहे.
मुंबई : बिग बाॅस 16 मध्ये घरातील स्पर्धकांनी मोठा हंगामा केला. बिग बाॅस 16 टीआरपीमध्येही टाॅपला राहिले. बिग बाॅस 16 ला त्याचा विजेता मिळाला असून 12 फेब्रुवारी रोजी बिग बाॅसचा फिनाले पार पडला. एमसी स्टॅन याच्या डोक्यावर बिग बाॅस 16 चा ताज आहे. जबरदस्त अशी फॅन फालोइंग एमसी स्टॅन याची आहे. विशेष बाब म्हणजे बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) मधून बाहेर पडल्यानंतर सतत एमसी स्टॅन याच्या फॅन फाॅलोइंगमध्ये वाढ होताना दिसत आहे. एमसी स्टॅन, साजिद खान, शिव ठाकरे, निम्रत काैर, अब्दु रोजिक आणि सुंबुल ताैकीर यांची खास मैत्री देखील बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाली. शिव ठाकरे (Shiv Thakare) हा बिग बाॅस 16 चा विजेता होईल, असे अनेकांना वाट होते. सोशल मीडियावरही शिव ठाकरे याच्याच नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला. एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. अनेकदा बिग बाॅसच्या घरात असताना एमसी स्टॅन म्हणायचा की, माझा भाऊ शिव ठाकरे हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला पाहिजे. शिव ठाकरे हा बिग बाॅस 16 चा सेकेंड रनरअप ठरला आहे.
शिव ठाकरे हा जरी बिग बाॅस 16 चा विजेता झाला नसला तरीही अनेकजण शिव ठाकरे याला बिग बाॅस 16 चा विजेता मानतात. इतकेच नाही तर बिग बाॅस 16 मधून बाहेर पडल्यानंतर शिव ठाकरे याच्या फॅन फाॅलोइंगमध्येही मोठी वाढ झालीये.
एमसी स्टॅन याच्यापेक्षा शिव ठाकरे याचा बिग बाॅसच्या घरात गेम चांगला होता. प्रत्येक टास्क शिव ठाकरे याने अत्यंत मेहनतीने केला. शिव ठाकरे याला बिग बाॅस 16 मध्ये बऱ्याच वेळा कॅप्टन होण्याची संधी देखील मिळाली आहे.
सध्या सोशल मीडियावर शिव ठाकरे प्रचंड चर्चेत आलाय. त्याचे कारणही तेवढेच खास आहे. नुकताच शिव ठाकरे हा मुंबईला विमानाने गेला. जिथे शिव ठाकरेला त्याची एअर होस्टेस असलेली मोठी फॅन भेटली. शिवा ठाकरे याला प्रत्यक्षात समोर पाहून एअर होस्टेस इतकी खुश झाली की तिने शिव ठाकरे याच्यासाठी खास चिठ्ठी लिहिली.
या स्पेशल चिठ्ठीमध्ये शिव ठाकरे याच्यासाठी एअर होस्टेसने एक खास मेसेज लिहिला आहे. चिठ्ठीमध्ये फॅन असलेल्या एअर होस्टेसने लिहिले की, मी तुझी प्रशंसा करते, मी तुझा आदर करते, तुला पुन्हा भेटून मला आनंद झाला आहे आणि तुला पुन्हा भेटायला मला नक्कीच आवडेल. आई शपथ। तुझ्यावर खूप प्रेम, आणि हो मी आणि माझी आई तुझे चाहते आहोत. आम्ही तुझ्यावर प्रेम आहे…
आता शिव ठाकरे याच्यासाठी एअर होस्टेसने लिहिलेली ही चिठ्ठी तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेक महिला चाहत्यांनीही सोशल मीडियावर शिव ठाकरे याला डेटबद्दल विचारले आहे. शिव ठाकरे याच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झालीये.