लोकप्रिय मालिकेतील मराठी अभिनेत्रीने सोडलं अभियनक्षेत्र; कारण ऐकून व्हाल थक्क!
'अनुपमा' (Anupamaa) या लोकप्रिय मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री अनघा भोसले (Anagha Bhosale) हिने अभिनयक्षेत्राला रामराम केला आहे. अनघा याआधीही टेलिव्हिजन इंडस्ट्री सोडण्याबाबत व्यक्त झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ती मालिकेत दिसत नसल्याने चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे तिच्याविषयी चिंता व्यक्त केली.
‘अनुपमा’ (Anupamaa) या लोकप्रिय मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री अनघा भोसले (Anagha Bhosale) हिने अभिनयक्षेत्राला रामराम केला आहे. अनघा याआधीही टेलिव्हिजन इंडस्ट्री सोडण्याबाबत व्यक्त झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ती मालिकेत दिसत नसल्याने चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे तिच्याविषयी चिंता व्यक्त केली. त्यानंतर आता खुद्द अनघाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित अभिनयक्षेत्र सोडल्याचं जाहीर केलं. देव आणि अध्यात्मचं (religious beliefs) कारण देत तिने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं. ‘माझ्या या निर्णयाचा तुम्ही आदर करावा आणि माझी साथ द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे’, असंही तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.
‘हरे कृष्ण.. मी अनुपमा या मालिकेत दिसत नसल्यानं तुम्ही सर्वांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली हे मला माहितीये. मला भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार. ज्यांना माहित नाही, त्यांना मी या पोस्टद्वारे कळवू इच्छिते, मी फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्री सोडली आहे. माझ्या या निर्णयाचा तुम्ही आदर करावा आणि माझी साथ द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे. मी अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यात्माविषयी असलेल्या श्रद्धांमुळे मी हा निर्णय घेतला आहे. तुम्ही सगळे आपआपले कर्म करत राहाल आणि जे तुम्हाला भगवान श्रीकृष्णापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांच्यापासून स्वत: दूर व्हाल हे मला माहित आहे’, असं तिने लिहिलंय.
अनघाची पोस्ट-
View this post on Instagram
अनुपमा या मालिकेतील तिच्या सहकलाकारांनी या पोस्टवर कमेंट्स केले आहेत. मालिकेत वनराजची भूमिका साकारणाऱ्या सुधांशू पांडेनं लिहिलं, ‘ही तुझी खरी इच्छा आहे, या प्रवासाचा आनंद घे’. तर मालिकेत अनघाचा प्रियकर समरची भूमिका साकारणाऱ्या पारस कलनावतने लिहिलं, ‘खूश राहा’. अनघाने यापूर्वी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हटलं होतं की ही इंडस्ट्री ढोंगी आणि दुटप्पी लोकांनी भरलेली आहे. त्यामुळेच तिला असा निर्णय घेण्यास भाग पाडलं कारण ती स्वतःला एक आध्यात्मिक व्यक्ती मानते. याआधी सना खान, झायरा वसीम, अनु अगरवाल यांसारख्या अभिनेत्रींनी धर्माचं कारण अभिनयक्षेत्र सोडलं होतं.
हेही वाचा:
राजामौली.. सिर्फ नाम ही काफी है! रामचरण-ज्युनियर एनटीआरची ‘पॉवरपॅक्ड’ जुगलबंदी