AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घरात देवोलीना भट्टाचार्यचा जोरदार हंगामा…

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) चे पर्व सध्या जोशात आले आहे. घरामध्ये दररोज नवीन हंगामा बघायला मिळत आहे.

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घरात देवोलीना भट्टाचार्यचा जोरदार हंगामा...
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 6:30 PM

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) चे पर्व सध्या जोशात आले आहे. घरामध्ये दररोज नवीन हंगामा बघायला मिळत आहे. आता बिग बॉसच्या घरात अर्शी खान (Arshi Khan)आणि देवोलीना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) यांच्या जोरदार वाद होताना दिसत आहेत. मात्र, या वादामध्ये देवोलीना भट्टाचार्य बिग बॉस घरातील अनेक वस्तूंची तोडफोड केली आहे, देवोलीनाने अर्शीच्या हातातील अन्न  फेकून देते अर्शीला शिवीगाळही करताना दिसत आहे. (Bigg Boss 14 Devoleena Bhattacharjee vs Arshi Khan)

देवोलीना भट्टाचार्यचे हे रूप बघून घरातील इतर सदस्य आवाक झाले. यावेळी अली गोनी तिला समजवण्यासाठी जातो त्यावेळी देवोलीना जोरजोरात ओरडत म्हणते की, अर्शी माझ्या घरच्यांविषयी बोलली आहे. त्यानंतर देवोलीना आपल्या मोर्चा बाथरूमकडे वळवते आणि तेथेही काही वस्तूंची मोडतोड करताना दिसत आहे. याच दरम्यान देवोलीना रूबीनालाही भांडताना दिसत आहे.

या अगोदरही देवोलीना अर्शीला शिव्या देताना विचित्र हातवारे करताना दिसली होती. गोपी बहु म्हणून प्रत्येक घरामध्ये पोहचलेल्या देवोलीना भट्टाचार्यचे हे रूप पाहुण प्रेक्षकांना धक्काच बसला आहे. अर्शीसोबतच्या भांडणामध्ये देवोलीना भट्टाचार्यने सर्व सिमा ओलांडल्या होत्या. देवोलीनाचे आणि अर्शी खानचे भांडणे किचनमध्ये सुरू झाली होती. देवोलीना अर्शीला म्हणत होती की, तु मला कांदे कट करून दे यावर अर्शी म्हणाली होती की, मी दुसरे काम करत आहे आणि यावरूनच देवोलीना राग आला आणि देवालीना अर्शीला शिवीगाळ करण्यास सुरू केले होते. तेवढ्यात तेथे अली आणि राहुल येतात ते देवोलीनाला समजून सांगत बाहेर नेतात. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. देवोलीनाच्या या वागण्यावर सलमान खान काय म्हणतो हे आता पाहण्यासारखे आहे.

संबंधित बातम्या : 

राखी सावंतवर पाणी फेकल्याने रुबीना गोत्यात; बिग बॉसने दिली ‘ही’ शिक्षा!

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या विजेत्याची फिनालेच्या 3 आठवड्यांपूर्वीच घोषणा, कोणी मारली बाजी पाहा?

Bigg Boss-14 | रितेश विवाहित, त्याला एक मुलगाही, राखी सावंतचा खळबजनक गौप्यस्फोट

(Bigg Boss 14 Devoleena Bhattacharjee vs Arshi Khan)

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.