Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरातलं आणखी एक ‘लव्ह कपल’ लवकरच लग्नबंधनात अडकणार!

विमानतळावर जास्मीन एकदम फंकी लूकमध्ये दिसली. यावेळी तिने ब्लॅक टॉप आणि ब्लॅक ट्राउझर्स परिधान केली होती. यासह तिने रेड कलरचा पुलओव्हरही कॅरी केला होतं. (Aly Goni Jasmin Bhasin)

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरातलं आणखी एक ‘लव्ह कपल’ लवकरच लग्नबंधनात अडकणार!
अली गोनीच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जास्मीन जम्मूला रवाना!
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 11:43 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता अली गोनी (Aly Goni) आणि अभिनेत्री जास्मीन भसीन (Jasmin Bhasin) नेहमीच त्यांच्या अभिनयाबद्दल चर्चेत असतात. पण, जेव्हापासून दोघांनीही आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली आहे, तेव्हापासून हे दोघेही बरेच चर्चेत आले आहेत. ‘बिग बॉस 14’च्या घरामध्ये जास्मीन आणि अली या दोघांनी पहिल्यांदा नॅशनल टीव्हीवर आपल्या नात्याची कबुली दिली. आता या दोघांच्याही लग्नाबाबत कयास सुरू होऊ लागले आहेत. आज, अर्थात मंगळवारी अली गोनी आणि जास्मीन भसीन हे मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. दोघेही अलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जम्मूला रवाना झाले आहेत (Bigg Boss 14 Love Birds Aly Goni and Jasmin Bhasin heads towards jammu).

अली गोनी हा मुळचा जम्मूचा असून, त्याचे संपूर्ण कुटुंब तिथेच राहते. असे सांगितले जात आहे की, जस्मीन भसीन केवळ अली गोनीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जम्मूला रवाना झाली आहे. यावरून असे दिसते की, हे दोघेही आता आपल्या लग्नासाठी कुटुंबीयांची संमती घेण्यासाठी जम्मूला रवाना झाले आहेत. तथापि, अद्याप त्या दोघांनीही याबाबत काहीही खुलासा केलेला नाही.

अली-जास्मीनचा एअरपोर्ट लूक

विमानतळावर जास्मीन एकदम फंकी लूकमध्ये दिसली. यावेळी तिने ब्लॅक टॉप आणि ब्लॅक ट्राउझर्स परिधान केली होती. यासह तिने रेड कलरचा पुलओव्हरही कॅरी केला होतं. त्याच वेळी अली गोनीने डेनिमसह पांढरा टी-शर्ट आणि ग्रीन जॅकेट परिधान केले होते.

जास्मीनसाठी ‘बिग बॉस’मध्ये अलीची एंट्री!

‘बिग बॉस 14’च्या घरात सुरुवातीला जास्मीन थोडी चिंताग्रस्त होती. पण, अली गोनी जेव्हा बिग बॉसच्या घरात दाखल झाला, तेव्हा जास्मीनचे एक नवे रूप सर्वांसमोर आले. जास्मीनसाठी अलीने ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक स्पर्धकाबरोबर ‘पंगे’ घेतले होते. या घरात अलीने रुबीनाला आपली बहीण मानले, तर राहुलबरोबरची त्याची मैत्री प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून गेली. तर, घरातून सुरुवातीला एलिमिनेट झालेली जास्मीन हिची काही काळानंतर घरात पुन्हा एकदा ‘वाईल्ड कार्ड’ एन्ट्री झाली होती. मात्र, तेव्हा ती खूप नकारात्मक दिसत होती आणि रुबीनाबरोबरही तिचा वाद झाला होता. अलीने नेहमीच तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला होतं. चाहत्यांनीही या दोघांच्या जोडीला खूप प्रेम दिले(Bigg Boss 14 Love Birds Aly Goni and Jasmin Bhasin heads towards jammu).

जास्मीनसाठी काहीही!

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यावर अलीने माध्यमांशी संवाद साधला होता. जास्मीनबरोबरच्या नात्याविषयी बोलताना अली म्हणाला की, मी जास्मीनसाठी काहीही करू शकतो. तो म्हणाला, ‘मी जास्मीन भसीनसोबत डेटवर जाऊ इच्छितो. आता कार्यक्रम संपला आहे, तेव्हा मी स्वत:चा आणि जास्मीनचा आरामात विचार करू शकतो. मला तिच्यासाठी सर्वकाही सर्वोत्तम हवे आहे. मला कोणतीही घाई नाही आणि मला एकामागून एक सावकाश सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. गरज भासल्यास मी जास्मीनच्या आई-वडिलांना आमच्या लग्नासाठी तयार करण्यासाठी काहीही करेन.’

(Bigg Boss 14 Love Birds Aly Goni and Jasmin Bhasin heads towards jammu)

हेही वाचा :

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.