Bigg Boss 16 | टीना दत्ता आणि शालीन भनोट यांच्यामध्ये पुन्हा जोरदार भांडणे, सलमान खान याने घेतला प्रियंकाचा क्लास
कारण घरातमध्ये एमसी स्टॅन आणि शालिनमध्ये वाद सुरू होता.
मुंबई : बिग बॉस 16 च्या विकेंडच्या वारमध्ये सलमान खानने घरातील काही दिवसांचा जोरदार क्लास घेतला. यामध्ये पहिले नाव होते, ते म्हणजे प्रियंका चाैधरी हिचे. कारण घरातमध्ये एमसी स्टॅन आणि शालिनमध्ये वाद सुरू होता. घरातील सदस्य तो वाद शांत करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, यादरम्यान शालिनला सुंबुल आणि प्रियंका भडकून देण्याचे काम करत होत्या. प्रियंकाने या वादामध्ये शिव ठाकरेला देखील घेतले. सलमान खान विकेंडच्या वारमध्ये प्रियंका चाैधरीला म्हणतो की, तू शालिन आणि एमसीच्या वादामध्ये घी टाकण्याचे काम केले.
एमसी आणि शालिनच्या वादामध्ये शालिन आणि टीनामध्येही वाद होतो. कारण बिग बाॅस टीनाला विचारतात की, यामध्ये चूक नेमकी कोणाची आहे. यावर टीना एमसीला वाचवते आणि चूक दोघांची असल्याचे टीना म्हणते. यामुळे शालिनला प्रचंड राग येतो.
शालिन बिग बाॅसचे घर सोडून जाण्याचे ठरवतो. मात्र, सलमान काही गोष्टी शालिनला समजून सांगतो. टीना देखील शालिनला समजावते. त्यानंतर यांच्यामध्ये परत एका मैत्री होते. परंतू या सर्व भांडणामध्ये सुंबुल शालिनसोबत टीनाला बोलू देत नाही. यावर सलमान सुंबुलला अनेक प्रश्न विचारतो.
the worst five contestants of the house r best friends again. how adorable ws Shiv going on n on kissing shalin after hitting n threatening him. super cute ??#BB16 #BiggBoss16 pic.twitter.com/suFo8uzHQv
— Rachit (@rachitmehra_2) November 19, 2022
विकेंड वारनंतर परत एकदा आता येणाऱ्या एपिसोडमध्ये टीना आणि शालिनमध्ये वाद झाल्याचे दिसत आहे. बिग बाॅसच्या घरात टीना आणि शालिनमध्ये वाद झाल्यावर सर्वात जास्त आनंद हा फक्त आणि फक्त सुंबुलला होतो. विकेंड वारमध्ये निम्रतला काही गोष्टी सलमान सांगण्याचा प्रयत्न करतो.
एमसीसोबत झालेल्या वादानंतर शालिन घरातील सदस्यांचे ऐकून घर सोडण्याचा विचार अगोदर करतो. परंतू त्यानंतर शालिन आपला निर्णय मागे घेतो. नाॅमिनेशनमध्ये या आठवड्यात बिग बाॅसच्या घरात गाैतम विज बाहेर पडणार असल्याच्या चर्चा आहेत. या आठवड्यात शालिन, टीना, साैंदर्या आणि गाैतम नाॅमिनेशनमध्ये होते.