Bigg Boss 16 Winner LIVE Updates | एमसी स्टॅन याच्या डोक्यावर ‘बिग बाॅस 16’चा ताज…

| Updated on: Feb 13, 2023 | 6:08 AM

Bigg Boss 16 grand finale LIVE Updates प्रेक्षकांमधील उत्साह प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. बिग बॉस 16 ची 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरूवात झाली होती. यादरम्यान घरातील स्पर्धेकांनी जबरदस्त मनोरंजन केले आहे. विशेष म्हणजे बिग बाॅस 16 हे टीआरपीमध्येही टाॅपला राहिले.

Bigg Boss 16 Winner LIVE Updates | एमसी स्टॅन याच्या डोक्यावर 'बिग बाॅस 16'चा ताज...

मुंबई : प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो बिग बाॅस 16 चा आज ग्रँड फिनाले पार पडणार आहे. हा ग्रँड फिनाले तब्बल पाच तास चालेल. या दरम्यान अनेक धमाकेदार डान्स बघायला मिळणार असून फुल मनोरंजन प्रेक्षकांचे होणार आहे. आज रात्री बारा वाजता सलमान खान हा बिग बाॅस 16 च्या विजेत्याची घोषणा करेल. शेवटी एमसी स्टॅन, शिव ठाकरे, प्रियंका चाैधरी, शालिन भनोट आणि अर्चना गाैतम यांच्यापैकी एक बिग बाॅस 16 चा विजेता ठरेल. ग्रँड फिनालेला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. प्रेक्षकांमधील उत्साह प्रचंड वाढल्याचे दिसून येतंय. बिग बॉस 16 ची 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरूवात झाली होती. यादरम्यान घरातील स्पर्धेकांनी जबरदस्त मनोरंजन केले आहे. विशेष म्हणजे बिग बाॅस 16 हे टीआरपीमध्येही टाॅपला राहिले.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Feb 2023 12:38 AM (IST)

    Bigg Boss 16 Winner LIVE Updates | एमसी स्टॅन बिग बॉस 16 चा बनला विजेता 

    शिव ठाकरे याला मागे टाकत एमसी स्टॅन बिग बाॅस 16 चा विजेता झाला आहे. त्याने बिग बाॅसची ट्रॉफी स्वत: च्या नावावर केलीये. ट्रॉफीसोबत एमसी स्टॅनला 31 लाख 80 हजार रुपये मिळाले आहेत. 

  • 13 Feb 2023 12:33 AM (IST)

    Bigg Boss 16 Winner | बिग बाॅस 16 चा विजेता ठरला एमसी स्टॅन

    बिग बाॅस 16 चा विजेता अखेर एमसी स्टॅन झाला आहे. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनमध्ये सुरूवातीला चुरशीची लढत बघायला मिळाली.

  • 13 Feb 2023 12:21 AM (IST)

    Bigg Boss 16 Winner LIVE Updates | शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनमध्ये चुरशीची लढत

    बिग बाॅस 16 मधून आता प्रियंका चाैधरी ही बाहेर पडली आहे. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये मोठी चुरस आता बघायला मिळणार आहे. प्रियंका हिचे नाव गेल्या काही दिवसांपासून विजेतेपदासाठी चर्चेत होते.

  • 13 Feb 2023 12:00 AM (IST)

    Bigg Boss 16 Winner LIVE Updates | प्रियंका चाैधरी बिग बाॅस 16 मधून बाहेर

    बिग बाॅस 16 च्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार प्रियंका चाैधरी ही बिग बाॅस 16 मधून बाहेर पडली आहे. आता एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे घरात आहेत.

  • 12 Feb 2023 11:55 PM (IST)

    Bigg Boss 16 Winner LIVE Updates | अब्दु रोजिक याने गायले भारतासाठी खास गाणे 

    बिग बाॅस 16 मध्ये अब्दु रोजिक हा सहभागी झाला होता. अब्दु रोजिक हा विदेशी नागरिक आहे. त्याची जगभरात जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे. बिग बाॅसच्या फिनालेमध्ये त्याने एक खास गाणे गायले आहे.

  • 12 Feb 2023 11:52 PM (IST)

    Bigg Boss 16 Winner LIVE Updates | एमसी स्टॅन याची गर्लफ्रेंड भडकली 

    सलमान खान याने एमसी स्टॅन याला त्याची गर्लफ्रेंड बुबा हिला बोलण्याची परवानगी दिली. यावेळी बुबा ही एमसी स्टॅनवर भडकली होती. कारण काही दिवसांपूर्वी प्रियंकाच्या चेहऱ्याचे काैतुक एमसी स्टॅनने केले होते. 

  • 12 Feb 2023 11:31 PM (IST)

    Bigg Boss 16 Winner LIVE Updates | बिग बॉसने एमसी स्टॅनला घरात पाठवले

    बिग बाॅस 16 मध्ये मोठा गोंधळ दिसला आहे. रिपोर्टनुसार एमसी स्टॅन याला परत बिग बाॅसने घरात घेतले असून प्रियंका चाैधरी ही बिग बाॅसमधून बाहेर पडलीये.

  • 12 Feb 2023 11:07 PM (IST)

    Bigg Boss 16 Winner LIVE Updates | सुंबुल ताैकीर हिचा धमाकेदार डान्स 

    बिग बाॅसच्या मंचावर सुंबुल ताैकीर हिने धमाकेदार डान्स केलाय. सुंबुल ताैकीर ही देखील बिग बाॅसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच ती बिग बाॅसच्या घरातून बेघर झाली होती.

  • 12 Feb 2023 11:04 PM (IST)

    Bigg Boss 16 Winner LIVE Updates | बिग बाॅस 16 च्या विजेत्याला मिळणार इतके लाख

    बिग बाॅस 16 च्या विजेत्याला आता 31 लाख रूपये मिळणार आहेत. बिग बाॅसच्या पहिल्या सीजनला विजेत्याला तब्बल 1 कोटी रूपये मिळाले होते. मात्र, गेल्या काही सीजनपासून बिग बाॅसने विजेत्याच्या रक्कममध्ये मोठी कपात केलीये.

  • 12 Feb 2023 10:59 PM (IST)

    Bigg Boss 16 Winner LIVE Updates | कृष्णा याने केले सलमान खान याच्यासोबत धमाल 

    कृष्णा अभिषेक याने बिग बाॅसच्या मंचावर येत सलमान खान याच्यासोबत धमाल केलीये. कृष्णाने खास पात्रामध्ये येत सर्वांना पोट धरून हासवले. या दरम्यान तो टीना दत्ता हिच्या आईसोबत मस्ती करताना देखील दिसला. 

  • 12 Feb 2023 10:53 PM (IST)

    Bigg Boss 16 Winner LIVE Updates | सलमान खान याने केली टीना दत्ता हिची इच्छा पूर्ण

    सलमान खान याने टीना दत्ता हिची इच्छा पूर्ण करत तिला सायकलवर बसवून स्टेजवर फेरफटका मारला आहे. यामुळे टीना खुश झालेली दिसत आहे. 

  • 12 Feb 2023 10:30 PM (IST)

    Bigg Boss 16 Winner LIVE Updates | शिव ठाकरे आणि प्रियंका चाैधरी यांच्यापैकी कोण होणार बिग बाॅस 16 चा विजेता?

    रिपोर्टनुसार एमसी स्टॅन हा आता बिग बाॅसच्या विजेत्याच्या रेसमधून बाहेर पडलाय. यामुळे आता खरी चुरस ही फक्त शिव ठाकरे आणि प्रियंका चाैधरीमध्ये बघायला मिळत आहे. यापैकी कोण विजेता होते, हे थोडच वेळात कळे.

  • 12 Feb 2023 10:25 PM (IST)

    Bigg Boss 16 Winner LIVE Updates | अर्चना गाैतम बिग बाॅसमधून बाहेर

    बिग बाॅस 16 मध्ये सर्वांसोबत भांडणे करणारी अर्चना गाैतम बेघर झालीये. मात्र, बिग बाॅसच्या रेसमधून बाहेर पडल्याचे कळताच अर्चना गाैतम रडण्यास सुरूवात करते.

  • 12 Feb 2023 10:16 PM (IST)

    Bigg Boss 16 Grand Finale LIVE | एमसी स्टॅन पडला रेसमधून बाहेर?

    एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 च्या रेसमधून बाहेर पडला आहे, अशी एक चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.

  • 12 Feb 2023 10:14 PM (IST)

    Bigg Boss 16 Grand Finale LIVE | शिव ठाकरे आणि प्रियंका चाैधरी फायनलमध्ये? 

    शिव ठाकरे आणि प्रियंका चाैधरी हे फायनलमध्ये गेल्याची चर्चा होती आणि एमसी स्टॅन हा बाहेर पडला. मात्र, आता नवे अपडेट येत असून बिग बाॅसने परत एकदा एमसीला घरात बोलावले आहे आणि प्रियंका चाैधरी ही बाहेर पडलीये.

  • 12 Feb 2023 10:11 PM (IST)

    Bigg Boss 16 Grand Finale LIVE | बिग ब्रदरमध्ये सहभागी होणार अब्दु रोजिक

    गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा होती की, अब्दु रोजिक हा बिग ब्रदरमध्ये सहभागी होणार आहे. आता स्वत: सलमान खान याला अब्दु रोजिक याबद्दल सांगणार आहे. म्हणजे आता बिग बाॅस मराठीनंतर अब्दु रोजिक हा बिग ब्रदरमध्ये धमाल करणार आहे.

  • 12 Feb 2023 10:07 PM (IST)

    Bigg Boss 16 Grand Finale LIVE | बिग बाॅसच्या घराबाहेर पडताच शालिन भनोट याचे नशीब उजळले

    बिग बाॅस 16 च्या घराबाहेर पडल्यानंतर शालिन भनोट याचे नशीब उजळले आहे. कारण एकता कपूर हिने थेट आता शालिन भनोट याला तिच्या नव्या शोची आॅफर दिली आहे.

  • 12 Feb 2023 10:05 PM (IST)

    Bigg Boss 16 Grand Finale LIVE | सनी देओल येणार बिग बाॅसच्या मंचावर

    तारा सिंह म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता सनी देओल बिग बाॅसच्या घरात थोड्याच वेळात दाखल होणार आहेत. गदर 2 चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सनी देओल हा बिग बाॅसच्या मंचावर येणार आहे. यावेळी अब्दू रोजिक हा सरदारजीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

  • 12 Feb 2023 10:01 PM (IST)

    Bigg Boss 16 Grand Finale LIVE | शालिन भनोट याला काढण्यासाठी बिग बाॅसने खेळला मोठा गेम

    तारा सिंह म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता सनी देओल हा थोड्याच वेळामध्ये बिग बाॅस 16 मध्ये दिसणार आहे. त्याच्या आगामी गदर 2 या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सनी देओल बिग बाॅसच्या मंचावर येणार आहे. यावेळी छोट्यासा अब्दु हा देखील सरदारजीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

  • 12 Feb 2023 08:52 PM (IST)

    Bigg Boss 16 Grand Finale LIVE | शालिन भनोट याला काढण्यासाठी बिग बाॅसने खेळला मोठा गेम

    तारा सिंह म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता सनी देओल हा थोड्याच वेळामध्ये बिग बाॅस 16 मध्ये दिसणार आहे. त्याच्या आगामी गदर 2 या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सनी देओल बिग बाॅसच्या मंचावर येणार आहे. यावेळी छोट्यासा अब्दु हा देखील सरदारजीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

    Bigg boss

  • 12 Feb 2023 08:24 PM (IST)

    Bigg Boss 16 Grand Finale LIVE |  एमसी स्टॅन याने अर्चना गाैतम हिच्याबद्दल केले मोठे विधान 

    बिग बाॅसच्या घरात एमसी स्टॅन आणि अर्चना गाैतम यांच्यामध्ये अनेकदा खटके उडाले होते. आता थेट अर्चना गाैतम हिला एमसी स्टॅन याने आद्रक, मुळा आणि पालक म्हटले आहे.

  • 12 Feb 2023 08:02 PM (IST)

    Bigg Boss 16 Grand Finale LIVE | बिग बाॅस 16 ला मिळाले टाॅप 3

    शालिन भनोट आणि अर्चना गाैतम हे बेघर झाल्याने आता बिग बाॅस 16 ला टाॅप 3 मिळाले आहेत. शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि प्रियंका चाैधरी हे बिग बाॅस 16 चे टाॅप 3 ठरले आहे. आता यांच्यापैकी एकजण हा बिग बाॅस 16 चा विजेता होईल.

  • 12 Feb 2023 07:57 PM (IST)

    Bigg Boss 16 Grand Finale LIVE | संगीत खुर्चीमध्ये अर्चना गाैतम विजेती

    अर्चना गाैतम हिने संगीत खुर्चीमध्ये विजय मिळवला आहे. यामध्ये शिव ठाकरे याला अर्चना गाैतम हिने हारवले आहे. संगीत खुर्चीचा टास्क अर्चना गाैतम हिने जिंकला आहे.

  • 12 Feb 2023 07:41 PM (IST)

    BB 16 Finale | फिनालेच्या दिवशी शिव आणि प्रियंकामध्ये मोठा वाद 

    बिग बाॅसच्या घरात स्पर्धक संगीत खुर्ची खेळताना दिसत आहेत. मात्र, यादरम्यान शिव ठाकरे आणि प्रियंका चाैधरी यांच्यामध्ये मोठा वाद बघायला मिळाला. सर्वांसमोर या दोघांनी कडाक्याची भांडणे केली.

  • 12 Feb 2023 07:33 PM (IST)

    Bigg Boss 16 Winner | कृष्णा आणि भारतीने उडवली घरातील सदस्यांची खिल्ली 

    बिग बाॅसच्या घरात दाखल होत कृष्णा आणि भारती यांनी घरातील सदस्यांची खिल्ली उडवली आहे. सर्वात अगोदर शिव आणि स्टॅनला टार्गेट करण्यात आले. त्यानंतर यांनी आपला मोर्चा हा अंकित गुप्ताकडे वळवला. 

  • 12 Feb 2023 07:29 PM (IST)

    अब्दुल रोजिक आणि साजिद खान यांची एन्ट्री

    अब्दु रोजिक आणि साजिद खान यांनी बिग बॉस 16 च्या फिनालेमध्ये एन्ट्री केलीये. अब्दु रोजिक आणि साजिद खान यांना सोबत पाहून चाहत्यांना झाला मोठा आनंद

  • 12 Feb 2023 07:21 PM (IST)

    Bigg Boss 16 | फायनलिस्टसोबत मस्ती करताना दिसला कृष्णा अभिषेक

    शिव ठाकरे, प्रियंका चाैधरी, शालिन भनोट, अर्चना गाैतम आणि एमसी स्टॅन यांच्यासोबत बिग बाॅसच्या घरात कृष्णा अभिषेक धमाल करताना दिसला.

  • 12 Feb 2023 07:16 PM (IST)

    Bigg Boss 16 LIVE | बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेला सुरुवात 

    भारती सिंह आणि कृष्णा अभिषेक यांनी दणदणीतपणे सलमान खान याच्यासोबत बिग बॉस 16 च्या फिनालेची सुरुवात केलीये. सलमान खान याने यावेळी भारती सिंह हिच्यासोबत रोमँटिक सीन केला

  • 12 Feb 2023 06:09 PM (IST)

    काम्या पंजाबीने केले महत्वाचे ट्विट

    काम्या पंजाबी हिने एक ट्विट केले आहे. यामध्ये काम्याने लिहिले की, गेल्या एका आठवड्यापासून मी बिग बाॅस बघत नाहीये….यावेळी खूप जास्त स्पर्धा ट्रॉफी जिंकण्यासाठी दिसली. शिव ठाकरे, एमसी स्टॅन किंवा प्रियंका चाैधरी यांच्यापैकी एकजण विजेता होऊ शकतो. 

  • 12 Feb 2023 05:38 PM (IST)

    शालिन भनोट याचा परफॉर्मेंस

    शालिन भनोट हा बिग बाॅस 16 मध्ये टाॅप 5 मध्ये दाखल झालाय. शालिन कायमच बिग बाॅसच्या घरात डान्स करताना दिसतो. बिग बाॅस 16 फिनाले म्हटल्यावर शालिन भनोट याचा डान्स होणार नाही असे होणे तर शक्य नाहीये ना…आज फिनालेमध्ये शालिन भनोट याचा जबरदस्त डान्स प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

  • 12 Feb 2023 05:25 PM (IST)

    एमसी स्टॅन यांची धमाकेदार एन्ट्री

    बिग बाॅस 16 मधील एक चर्चेचे नाव म्हणजे एमसी स्टॅन हे आहे. फिनालेमध्ये एमसी स्टॅन यांचा डान्स प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एमसी स्टॅन हा एक रॅपर असून त्याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे.

    View this post on Instagram

    A post shared by ColorsTV (@colorstv)

  • 12 Feb 2023 05:22 PM (IST)

    अब्दु रोजिक आणि साजिद खान यांचा स्पेशल डान्स 

    बिग बाॅस 16 मध्ये अब्दु रोजिक आणि साजिद खान यांच्यामध्ये एक खास मैत्री बघायला मिळाली. या जोडीला प्रेक्षकांचेही प्रचंड प्रेम मिळाले. आता ग्रँड फिनालेमध्ये ‘मैं खिलाडी तू अनारी’ या गाण्यावर धमाकेदार डान्स अब्दु रोजिक आणि साजिद खान यांचा बघायला मिळणार आहे. 

Published On - Feb 12,2023 5:19 PM

Follow us
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.