Bigg Boss 16 | शालिन भनोट याने थेट कृष्णा अभिषेक याची बोलती केली बंद, म्हणाला…
बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडताना निम्रत काैर म्हणाली की, शिव ठाकरे किंवा एमसी स्टॅनच विजेते झाले पाहिजेत. मंडळीमधील सदस्य विजेता व्हावा, असे सुंबुल ताैकीर हिने देखील म्हटले होते.
मुंबई : बिग बाॅसमध्ये फिनाले विक सुरू आहे. बिग बाॅसच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसह घरातील सदस्यांना मोठा धक्का देत निम्रत काैर हिला बेघर केले आहे. काल घरामध्ये बिग बाॅसचे (Bigg Boss) काही प्रेक्षक आले आणि त्यांनी घरातील सदस्यांना मत दिले. यावेळी शिव ठाकरे याची हवा बघायला मिळाली. घरामध्ये आलेले स्पर्धेक हे शिव ठाकरे याला सपोर्ट करताना दिसले. या दरम्यान अर्चना गाैतम आणि शालिन भनोट (Shalin Bhanot) डान्स करताना पडले, हे पाहून प्रेक्षकांना देखील आपले हसू आवरत कठिण झाले होते. निम्रत काैर ही बेघर झाल्याने आता मंडळीतील फक्त शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे घरामध्ये आहेत. बाकी प्रियंका चाैधरी, शालिन भनोट आणि अर्चना गाैतम असे पाच सदस्य बिग बाॅसच्या घरात असून ते फिनालेसाठी पोहचले आहेत. बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडताना निम्रत काैर म्हणाली की, शिव ठाकरे किंवा एमसी स्टॅनच विजेते झाले पाहिजेत. मंडळीमधील सदस्य विजेता व्हावा, असे सुंबुल ताैकीर हिने देखील म्हटले होते.
फिनालेला काही दिवस शिल्लक असताना घरामध्ये मोठा हंगामा होताना दिसत आहे. बिग बाॅसच्या घरात टेन्शनचे वातावरण असून घरामध्ये फक्त पाच सदस्यच आहेत. बिग बाॅसने
घरातील सदस्यांचे टेन्शन कमी करण्यासाठी घरामध्ये कृष्णा अभिषेक याला पाठवले आहे. यावेळी कृष्णा अभिषेक घरातील सदस्यांसोबत मस्ती करताना दिसला.
View this post on Instagram
नुकताच व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, कृष्णा अभिषेक हा बिग बाॅसच्या घरात आला असून तो घरातील सदस्यांसोबत धमाल करत आहे. यावेळी कृष्णा अभिषेक हा शालिन भनोट याची फिरकी घेताना दिसला.
कृष्णा अभिषेक याने शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियंका चाैधरी यांची खिल्ली उडवली. मात्र, ज्यावेळी कृष्णा अभिषेक हा शालिन भनोट याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी शालिन भनोट हा कृष्णा अभिषेक याला असे काही बोलतो की, त्याची बोलतीच बंद होते.
कृष्णा अभिषेक हा शालिन भनोट याला म्हणतो की, तू ओव्हर अॅंक्टिंग करत आहे…यावर शालिन भनोट म्हणतो की, तू अॅंक्टिंगमध्ये माझा सिनिअर आहे…शालिन भनोट याचे हे बोलणे ऐकता कृष्णा अभिषेक याची बोलती बंद झाली.
सोशल मीडियावर सतत चर्चा रंगत आहे की, बिग बाॅस १६ चा विजेता कोण होणार? यामध्ये शिव ठाकरे याचे पारडे जड दिसत आहे. शिव ठाकरे याला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताना दिसत आहेत. विजेत्याच्या स्पर्धेमध्ये शिव ठाकरे आणि प्रियंका चाैधरीचे नाव आघाडीवर आहे.