एकेकाळी रस्त्यावर झोपण्याची वेळ आणि आता आहे कोट्यावधीचा मालक, जाणून घ्या एमसी स्टॅन याची स्टोरी
एमसी स्टॅन, साजिद खान, अब्दु रोजिक आणि शिव ठाकरे यांची मैत्री चाहत्यांना प्रचंड आवडलीये. अब्दु रोजिक आणि साजिद खान हे दोघेही बिग बाॅसच्या घराबाहेर आहेत.
मुंबई : बिग बाॅस १६ चा फिनाले अवघ्या काही तासांवर आला आहे. जसा जसा फिनाले जवळ येतोय तसा प्रेक्षकांमधील उत्साह वाढला आहे. बिग बाॅस १६ (Bigg Boss 16) मधून चाहत्यांचे प्रचंड मनोरंजन झाले. यावेळी घरामध्ये सहभागी झालेले सर्वच स्पर्धेक हे जबरदस्त पध्दतीने मनोरंजन करताना दिसले. यावेळी टीआरपीमध्ये बिग बाॅस (Bigg Boss) टाॅपला असल्याने बिग बाॅसच्या निर्मात्यांनी घरातील सदस्यांना काही खास टास्क दिले नाहीत. मात्र, तरीही घरातील सदस्य धमाका करताना दिसले. बिग बाॅस १६ च्या सुरूवातीला सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदु राहिला म्हणजे तो अब्दु रोजिक हा. १८ वर्षांचा अब्दु रोजिक हा बिग बाॅसच्या घरात सहभागी झाला होता. अब्दू रोजिक हा गायक असून त्याचे भारतामध्येही मोठे फॅन असून तो लवकरच सलमान खान (Salman Khan) याच्या चित्रपटामधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी कामामुळे अब्दु रोजिक याला बिग बाॅसचे घर सोडावे लागले होते.
एमसी स्टॅन, साजिद खान, अब्दु रोजिक आणि शिव ठाकरे यांची मैत्री चाहत्यांना प्रचंड आवडलीये. अब्दु रोजिक आणि साजिद खान हे दोघेही बिग बाॅसच्या घराबाहेर आहेत. मात्र, अजूनही घरात शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन आहेत.
एमसी स्टॅन याचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षा म्हणून बिग बाॅसने एमसी स्टॅन याला काही आठवड्यांसाठी नाॅमिनेशनमध्ये टाकले होते…सतत नाॅमिनेशनमध्ये राहूनही तो बेघर झाला नाही.
एमसी स्टॅन अनेकदा मला बिग बाॅसच्या घराबाहेर जायचे आहे, असे म्हणताना दिसला होता. इतकेच नाही तर एकवेळा तर स्वत: सलमान खान याने एमसी स्टॅन हा घरात राहवा यासाठी प्रयत्न केले होते.
एमसी स्टॅन हा मुळचा पुण्याचा असून वयाच्या अवघ्या १२ वर्षांपासून त्याने कव्वाली म्हणण्यास सुरूवात केली होती. आता तो एक फेमस रॅपर असून त्याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून एमसी इथंपर्यंत आलाय.
एकेकाळी पैसे नसल्याने तो रस्त्यावर झोपायचा. एमसी स्टॅन याचे पहिले गाणे समझ मेरी बात को प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र, खरी ओळख एमसी स्टॅनला वाटा या गाण्यामधून मिळाली. या गाण्याला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. एमसी स्टॅन याचा चाहता वर्ग बघता स्टॅनही बिग बाॅस १६ चा विजेता होऊ शकतो.