गुजरात दंगलीत घर उद्धवस्त झालं, 16 व्या वर्षी आईचं छत्र हरपलं; Munawar Faruqui चा डोंगरी ते बिग बॉस प्रवास

Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui Lifestory : गुजरात दंगलीत Munawar Faruqui चं घर गेलं, आईला गमावलं, वडिलांच्या आजारपणामुळं घराची जबाबदारी आली...; Bigg Boss 17 च्या विजेत्याची कहानी. स्टंड-अप कॉमेडियन कसा झाला बिग बॉसचा विजेता? त्याची लाईफस्टोरी काय आहे? वाचा सविस्तर...

गुजरात दंगलीत घर उद्धवस्त झालं, 16 व्या वर्षी आईचं छत्र हरपलं; Munawar Faruqui चा डोंगरी ते बिग बॉस प्रवास
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 11:27 AM

मुंबई | 29 जानेवारी 2024 : बिग बॉसच्या 17 व्या सिझनचा ग्रँड फिनाले काल पार पडला. स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारूकी बिग बॉसच्या 17 व्या सिझनचा विजेता ठरला. मुनव्वर फारूकीला बिग बॉस 17 च्या ट्रॉफीसोबतच 50 लाख रुपये आणि ह्युंडाई क्रेटा ही कार मिळाली आहे. पण मुनव्वरचा आजपर्यंतचा प्रवास प्रचंड खडतर राहिला. मुंबईतील डोंगरी भागात राहणाऱ्या या कॉमेडियनने अनेक धक्के पचवले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये तो सहभागी झाला. शिवाय त्याने आपल्या खास अंदाजाने लोकांची मनं जिंकली. अन् ‘लॉक अप’ हा शो देखील…

गुजरातमध्ये बालपण

मुनव्वरचं बालपण गुजरातच्या जुनागढमध्ये गेलं. 2002 ला उसळलेल्या दंगलीत मुनव्वरचं घर उद्धवस्त झालं. वयाच्या अवघ्या 16 वर्षी मुनव्वरच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं. पुढे मुनव्वर आणि त्याच्या तीन बहिणींना घेऊन त्याचे वडील मुंबईतील डोंगरी भागात राहायला आले. पण इथे आल्यावरही संघर्षाने त्याची पाठ सोडली नाही. वडिलांच्या आजारपणामुळे त्याला घराची जबाबदारी उचलावी लागली.

भांड्याच्या दुकानात काम

घरातील खर्च भागवण्यासाठी त्याने एका भांड्याच्या दुकानात काम केलं. ग्राफिक्स डिझायनिंग तो करू लागला. यातूनच त्याला त्याच्यातील कलाकार सापजडला. कारण पोस्टरवर एका ओळीची पंचलाईन असते. त्या ओळी लिहिताना मुनव्वरला जाणवलं की, आपण छान लिहू शकतो.

मुनव्वर झाला कॉमेडियन

पुढे त्याची पावलं स्टँडअप कॉमेडीकडे वळाली. त्याच्या शोला लोक गर्दी करू लागले. त्याच्या पंचला लोक रिस्पॉन्स देई लागले. यूट्यूबवर त्याच्या शोला पसंती मिळू लागली. पुढे कंगना रनौतचा ‘लॉक अप’ हा रिअॅलिटी शो आला. त्याला तिथे बोलावलं गेलं. तो सहभागी झाला अन् जिंकला सुद्धा… अन् आता बिग बॉसच्या 17 व्या सिझनमध्ये तो पोहोचला. तेव्हापासूनच लोकांचं प्रेम त्याला मिळालं अन् तो या शोचा विजेता ठरला. बिग बॉस 17 च्या विजेतेपदाचा किताब मुनव्वरच्या नावावर आहे. बिग बॉसच्या घरातील एक- एक टप्पा पार करत मुनव्वरने जेतेपदाची ट्रॉफी जिंकली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.