Bigg Boss 16 | टीना दत्ता आणि शालिन भनोट बिग बाॅसच्या निशाण्यावर
आता हे दोघे काय धमाका करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
मुंबई : यंदाचे बिग बाॅसचे सीजन रंगात आले असून घरामध्ये मोठे हंगामे होताना दिसत आहेत. नुकताच बिग बाॅसच्या घरात गोल्डन बॉईजने वाइल्डकार्ड एन्ट्री घेतली आहे. आता हे दोघे काय धमाका करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. नेहमीप्रमाणेच अर्चनाने घरात आलेल्या नव्या सदस्यासोबत चांगले वागण्यासाठी गोल्डन बॉईजसाठी स्पेशल जेवण तयार केले. घरामध्ये कोणीही नवा पाहूणा आला की, चार दिवस अर्चना त्यांच्यासोबत चांगले राहते आणि नंतर कारण नसताना देखील भांडणे काढते.
नुकताच बिग बाॅसने रिलीज केलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, बिग बाॅस शालिन भनोटचा क्लास घेतात. टीनासोबत बोलत असताना शालिन इंग्रजीमध्ये बोलतो. यावेळी बिग बाॅस त्याला हिंदीमध्ये बोलण्यास असे चार वेळा सांगतात.
Ranking ke iss process ki wajah se bigad gaya ghar ka taapmaan, Do you agree with #NimritKaurAhluwalia ’s decision? ?#BB16 #BiggBoss16 #BiggBoss @BeingSalmanKhan pic.twitter.com/iyjNXaIoCq
— ColorsTV (@ColorsTV) November 30, 2022
बिग बाॅस सतत शालिनला हिंदी भाषेचा प्रयोग करा असे सांगतात. परंतू प्रत्येकवेळी बिग बाॅसच्या बोलण्याकडे शालिन लक्ष देत नाही. मग काय शालिनचा चांगलाच समाचार बिग बाॅस घेतात.
टीना गेल्या काही दिवसांपासून बिग बाॅसवर अनेक आरोप करत आहे. त्यामध्ये गोल्डन बॉईज घरामध्ये आल्यानंतर टीना त्यांना बाहेरील गोष्टी विचारते. ज्यावर बिग बाॅस तिला फटकारतात.
#PriyankaChaharChoudhary aur #AnkitGupta huye @ShivThakare9 par haavi. Who has a stronger point? ??#BB16 #BiggBoss16 #BiggBoss @BeingSalmanKhan pic.twitter.com/lja0iVgiYD
— ColorsTV (@ColorsTV) November 30, 2022
बिग बाॅस शालिनला थेट म्हणतात की, हे माझे घर आहे आणि इथे माझे नियम फक्त चालतात. यामुळे तुला हिंदी भाषेमध्येच बोलावे लागणार आहे. यावेळी शालिन शांत बसतो आणि बिग बाॅसचे बोलणे ऐकून घेतो.
बिग बाॅसच्या घरात साैंदर्या शर्मा, निम्रत, टीना आणि शालिन सतत इंग्रजीमध्ये बोलतात. यापूर्वी बिग बाॅसने इंग्रजीमध्ये बोलल्याबद्दल साैंदर्या शर्मा आणि निम्रत शिक्षा देखील दिली आहे.