Bigg Boss Marathi 3 | नेहा खान, तेजश्री प्रधान ते ऋषी सक्सेना, ‘बिग बॉस मराठी 3’साठी चर्चेतील 15 नावं

'बिग बॉस'च्या निर्मात्यांनी ज्या सेलिब्रिटींना संपर्क साधला आहे, अशा काही जणांची नावं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तर 'बिग बॉस'च्या घरात कोणाला पाहायला आवडेल, याची नावंही चाहत्यांनी शेअर केली आहेत. पाहुया त्यापैकी काही कलाकारांची नावं

Bigg Boss Marathi 3 | नेहा खान, तेजश्री प्रधान ते ऋषी सक्सेना, 'बिग बॉस मराठी 3'साठी चर्चेतील 15 नावं
'बिग बॉस मराठी' तिसऱ्या सिझनसाठी चर्चेतील नावं
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 9:15 AM

मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याआधी ‘बिग बॉस मराठी 3’ मध्ये कोणकोणते सेलिब्रिटीज सहभागी होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘देवमाणूस’ मालिकेतील एसीपी दिव्या सिंहच्या भूमिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली अभिनेत्री नेहा खानपासून ‘अग्गंबाई सासूबाई’मुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची नावं चर्चेत आहेत. (Bigg Boss Marathi 3 Colors Marathi Reality Show Possible Contestant List)

‘बिग बॉस’च्या घरात कोण सहभागी होणार, याचं सिक्रेट प्रत्यक्ष कार्यक्रम सुरु झाल्यानंतरच उघड होतं. कोणत्याही कलाकाराला त्याविषयी अधिकृत भाष्य करण्याची परवानगी नसते. मात्र ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी ज्या सेलिब्रिटींना संपर्क साधला आहे, अशा काही जणांची नावं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तर ‘बिग बॉस’च्या घरात कोणाला पाहायला आवडेल, याची नावंही चाहत्यांनी शेअर केली आहेत. पाहुया त्यापैकी काही कलाकारांची नावं

बिग बॉसच्या घरासाठी चर्चेतले चेहरे

अभिनेत्री नेहा खान – ‘देवमाणूस’ मालिकेतील एसीपी दिव्या सिंहच्या भूमिकेमुळे लोकप्रिय. मात्र झी मराठीवर सुरु असेलली मालिका आणि त्यातील लोकप्रिय व्यक्तिरेखेला रामराम ठोकून नेहा कलर्स मराठीकडे वळण्याची शक्यता कमी मानली जाते.

अभिनेत्री तेजश्री प्रधान- ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेनंतर तेजश्री सध्या छोट्या पडद्यावर दिसलेली नाही. सोशल मीडियावर सर्वाधिक फॅनपेज असलेली अभिनेत्री म्हणून तेजश्री ओळखली जाते. त्यामुळे तिला बिग बॉसच्या घरात पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

अभिनेत्री अक्षया देवधर – ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील पाठकबाई अर्थात अंजलीच्या भूमिकेमुळे अक्षया कमालीची लोकप्रिय झाली आहे. अक्षयाही सध्या छोट्या पडद्यावर दिसत नाही. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अभिनेता सुयश टिळक – अक्षया देवधरच्या नावाची चर्चा होत असतानाच तिचा एक्स बॉयफ्रेण्ड आणि अभिनेता सुयश टिळक याचं नाव ‘बिग बॉस मराठी 3’ साठी घेतलं जाणं भुवया उंचावणारं आहे. अक्षया-सुयश यांनी आपल्या नात्याचा कधीच उघड स्वीकार केला नव्हता. मात्र बिग बॉसच्या घरात दोघं एकत्र दिसल्यास निर्मात्यांना अपेक्षित मसाला पाहायला मिळणार का, याकडे लक्ष आहे.

अभिनेता संग्राम समेळ-पल्लवी पाटील – संग्राम समेळ आणि पल्लवी पाटील हे एक्स कपल. काही महिन्यांपूर्वीच दोघं विभक्त झाले. त्यानंतर संग्राम पुन्हा विवाहबंधनात अडकला. आता बिग बॉसच्या घरात हे घटस्फोटित दाम्पत्य एकमेकांसमोर आलं, तर टशन पाहायला मिळू शकते.

अभिनेत्री पल्लवी सुभाष – गुंतता हृदय हे मालिकेतून झळकलेली अभिनेत्री पल्लवी सुभाष मराठीत फारशी रमली नाही. हिंदीत तिने अनेक मालिका केल्या आहेत. पल्लवीच्या रुपाने बिग बॉसला ग्लॅमरस तडका मिळेल, यात शंका नाही

अभिनेत्री रसिका सुनील – रसिका म्हणजेच माझ्या नवऱ्याची बायकोमधली लाडकी शनाया. शनायाला पाहणं बिग बॉसच्या घरात व्हिज्युअल ट्रीट असेल. सध्या रसिका लहान पडद्यावर दिसत नाही.

अभिनेत्री केतकी चितळे – केतकी चितळेने आंबटगोड, तुझं माझं ब्रेक अप यासारख्या मालिकांमधून जितकी छाप सोडली नाही, त्याहून जास्त तिच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टची चर्चा व्हायची. तिचं नाव गेल्या वेळीही चर्चेत होतं. यंदा तिने ऑफर स्वीकारल्यास बिग बॉसच्या घराला वादाची फोडणी मिळण्यास नक्कीच मदत होईल.

अभिनेता चिन्मय उदगीरकर – चिन्मय उदगीरकर सध्या अग्गंबाई सूनबाई मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारतोय. याआधी तो कलर्स वाहिनीवरच सख्खे शेजारी मालिकेचं सूत्रसंचालन करत होता. त्यामुळे झीची मालिका सोडून तो पुन्हा कलर्सकडे वळणार का, याची उत्सुकता आहे.

अभिनेता ऋषी सक्सेना – काहे दिया परदेस मालिकेतील शिव. अभिनेत्री इशा केसकरसोबत तो रिलेशनशीपमध्ये आहे. ऋषीच्या रुपाने तरुणींच्या गळ्यातील ताईत बिग बॉसच्या घरात दिसणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

याशिवाय, अभिनेत्री नेहा जोशी, तसेच अंशुमन विचारे आणि समीर चौगुले यासारखे विनोदी कलाकार, अभिनेत्री निशिगंधा वाड, अभिनेत्री किशोरी आंबिये यासारख्या मध्यमवयीन अभिनेत्रींची नावंही चर्चेत आहेत.

मांजरेकरांकडेच पुन्हा सूत्रसंचालन

दिग्गज अभिनेते-निर्माते महेश मांजरेकर ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन करतात. मांजरेकरांच्या स्टाईलचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे पुढील सिझनची सूत्रंही मांजरेकरांच्याच हाती सोपवली जाणार आहेत. दोन वर्षापासून ‘बिग बॉस’चा मराठमोळा आवाज नव्याने ऐकण्यासाठी प्रेक्षकांने कान आसुसले आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे विजेती ठरली होती. तर दुसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर शिव ठाकरेने आपले नाव कोरले होते. आता या सीझनमध्ये कोण सहभागी होणार याची उत्सुकता वाढली आहे.

संबंधित बातम्या :

Bigg Boss Marathi 3 Promo | ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची उत्सुकता संपली, मांजरेकरांनी शेअर केला प्रोमो

(Bigg Boss Marathi 3 Colors Marathi Reality Show Possible Contestant List)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.