बाहेरुन पाठिंबा चालेल का? पंकजांचा प्रश्न, रोहित पवार म्हणतात, आताचं सेशन बघता भाजपचा बाहेरुन पाठिंबा वाटतोय

'ताई सगळ्यांनाच खाऊ घालतात, काँग्रेस झालं, राष्ट्रवादीलाही कधीतरी आमंत्रण द्या, नवनवीन आमदारांना' असंही रोहित पवार पंकजांना म्हणाले. त्यावर 'मी तुम्हाला आमंत्रण द्यायला तयार आहे, तुम्हाला जे आवडतं, ते खाऊ घालायची माझ्याकडे कला आहे.' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

बाहेरुन पाठिंबा चालेल का? पंकजांचा प्रश्न, रोहित पवार म्हणतात, आताचं सेशन बघता भाजपचा बाहेरुन पाठिंबा वाटतोय
पंकजा मुंडे, रोहित पवार
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 11:47 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar), भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी नुकतीच झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी करायच्या मदतीवरुन ‘बाहेरुन पाठिंबा चालेल का?’ असा सूचक प्रश्न पंकजा मुंडे यांनी रोहित पवारांना विचारला. त्यावर ‘आताचं सेशन बघितल्यानंतर भाजपचा बाहेरुन पाठिंबा असल्यासारखं वाटतंय’ असं प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिलं.

‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात तीन सेलिब्रिटी सहभागी होतात. त्यानंतर महाराज अर्थात दिग्गज अभिनेते प्रशांत दामले प्रत्येकाला एक-एक पदार्थ बनवण्यासाठी सांगतात. त्यातून उत्तम पदार्थ बनवणारा सेलिब्रिटी त्या दिवसाचा विजेता ठरतो. पंकजा मुंडे यांना चिकन रस्सा, रोहित पवार यांना पोहे किंवा उपमा, तर प्रणिती शिंदे यांना उसळ भाकरी हे पदार्थ करण्याचं आव्हान देण्यात आलं.

‘भाजपचा बाहेरुन पाठिंबा असल्यासारखं वाटतंय’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने स्पर्धेचे नियम समजावून सांगताना राजशेफची भूमिका स्पष्ट करुन सांगितली. राजशेफ अर्थात मधुराज् रेसिपी फेम मधुरा बाचल स्पर्धकांना मदत करु शकतात. मात्र त्यांचे हात बांधलेले असणार, त्या प्रत्यक्ष पदार्थ बनवण्यात मदत करु शकणार नाहीत, केवळ सूचना देतील, थोडक्यात बाहेरुन पाठिंबा आहे, अशी मिश्कील टिपणी संकर्षणने केली. त्यावर बोलताना, ‘असं चालेल का रोहित? बाहेरुन पाठिंबा वगैरे’ असा तिरकस प्रश्न पंकजांनी विचारला. तेव्हा ‘आताचं सेशन बघितल्यानंतर भाजपचा बाहेरुन पाठिंबा असल्यासारखं वाटतंय’ असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं.

‘ताई सगळ्यांनाच खाऊ घालतात, काँग्रेस झालं, राष्ट्रवादीलाही कधीतरी आमंत्रण द्या, नवनवीन आमदारांना’ असंही रोहित पवार पंकजांना म्हणाले. त्यावर ‘मी तुम्हाला आमंत्रण द्यायला तयार आहे, तुम्हाला जे आवडतं, ते खाऊ घालायची माझ्याकडे कला आहे.’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

गटारी अमावस्येचा धमाल किस्सा

पंकजा मुंडे यांनी लहानपणापासून आपल्याला एखाद्या कुकरी शोमध्ये सहभागी व्हायची आवड असल्याचं सांगितलं. ‘आमच्याकडे ज्योतिर्लिंग असल्याने आम्ही पूर्वी श्रावण पाळायचो. त्यावेळी मांसाहार करायचो नाही. गटारी अमावस्या हा मांसाहाराचा शेवटचा दिवस. काही वर्षांपूर्वी गटारी अमावस्येच्या रात्री मी घरी जात होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याचा फोन आला, की ताई मी तुम्हाला मस्तपैकी मटणाचा रस्सा पाठवून देतो. मी बरं म्हटलं. रात्री घरी पोहोचले आणि रश्श्यात मटण शोधत होते. तर एकही पीस सापडेना. मी त्याला फोन केला, तर म्हणतो, मी फक्त मटणाचा रस्सा म्हटलं होतं. त्यानंतर महिना भर त्याला सुनवत होते’ अशी धमाल आठवण पंकजांनी सांगितली.

संबंधित बातम्या :

Murder at Teesri Manzil 302 Review : 14 वर्षांनंतर रिलीज झाला इरफान खान यांचा सिनेमा; कसा आहे, वाचा…

BTS बँड नवीन वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या चाहत्यांना देणार ‘हे’ खास सरप्राइझ…

Year Ender 2021 : ‘रांझा’पासून ते ‘नदियों पार’ पर्यंत, ‘या’ सुपरहिट गाण्यांनी 2021मध्ये घातला धुमाकूळ!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.