सूरज चव्हाणच्या लग्नाचं घन:श्यामला टेन्शन; गुलीगत फेम लग्न कधी करणार?

Ghandyam Darade and Suraj Chavan Discussion : बिग बॉसच्या घरात सतत काही ना काही घडत असतं. या बिग बॉसच्या घरातील सदस्यांमधील संवाददेखील प्रचंड चर्चेचा विषय होत आहे. नुकतंच सूरज चव्हाण आणि छोटा पुढारी यांच्यातील संवाद चर्चेत आला आहे. वाचा सविस्तर बातमी...

सूरज चव्हाणच्या लग्नाचं घन:श्यामला टेन्शन; गुलीगत फेम लग्न कधी करणार?
घन:श्याम आणि सूरजImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 1:41 PM

गुलीगत फेम सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी’चा हा नवा सिझन गाजवतोय. त्याच्या डायलॉग्सची सर्वत्र जोरदार चर्चा असते. सूरज चव्हाण आणि छोटा पुढारी यांच्यात खास बोलणं झालं. सूरज आणि घन: श्याम यांच्यात लग्नावरून बोलणं झालं. ‘बिग बॉस मराठी’चे नवे पर्व चांगलेच गाजाताना आपल्याला दिसत आहे. या नव्या पर्वावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम करत आहेत. तसेच बिग बॉसच्या घरात सदस्स एकमेकांवर प्रेम ही करतात आणि टास्कमध्ये एकमेकांविरोधत उभे देखील राहतात. पण सध्या सूरज चव्हाण आणि घन:श्याम या दोघांमध्ये लग्नावरून बोलणं झालं. ते सध्या चर्चेत आहे.

सूरजच्या लग्नावर बिग बॉसच्या घरात चर्चा

 ‘बिग बॉस मराठी’  च्या आजच्या भागात गार्डन एरियात सूरज आणि घनश्याम यांच्यामध्ये संवाद झाला. सूरजच्या लग्नाबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. आजच्या अनसीन अनदेखामध्ये प्रेक्षकांना हे पाहता येईल. तुझ्या लग्नात करवला नको का? मग मी आहे ना.. मग तूझ्या लग्नात आपल्याला तूझ्या आवडीचे कपडे घ्यायला लागणार. आम्हाला वहिनी पाहिजे बाबा.. मेकअप करायला.. आम्हाला हक्काची वहिनी हवी आहे. तुला एवढे शॉपिंगचे समजत नाही आमची वहिनी आम्हाला सांगेल भाऊजी ही बूटे घ्या. तुझ लग्न एकदम दणक्यात करायचे. डिजे लावायचा, घोडा लावायचा…, असं घनश्याम सूरजला म्हणतो.

घन:श्याम काय म्हणाला?

त्यावर सुरज म्हणतो, “घोडा लावायचा नाही.. घोडा नाचवायचा रे!” अरे घोडा असा आणायचा त्यावर तू बसायचे. घोडा असा मस्त नाचणारा असला पाहिजे… फक्त तुला पाडले नाही पाहिजे. सगळा खर्च आपण करू. नवरीकडच्या लोकांनी खर्च नाही केला तरी चालेल आणि सगळ्यांत महत्वाचे वहिनी आम्ही ठरवणार तू नाही ठरवायची. आम्ही बघू आम्हाला वहिनी कशी हवी ते, असं घन:श्याम म्हणतो. त्यानंत तुझ्या लग्नात मी किती दिवस आधी येऊ?, असंही घनश्याम विचारतो. एक महिना आधी ये तू. घालू मस्त राडा आपण, असं सूरज त्याला म्हणतो.

सूरज चव्हाण बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन झाला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात आता रंगत आली आहे. आमचा कॅप्टन म्हणजे सूरज…, असं बिग बॉसच्या घरातील सदस्य म्हणताना दिसत आहे. सूरजच्या कॅप्टन्सीचा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.