CID मालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची बॅग बसमधून लंपास; पैसे, कागदपत्रं चोरीला

कुटुंबीयांसोबत एलिफंटा केव्सला भेट देण्यासाठी जाताना ही घटना घडल्याचं त्याने सांगितलं. त्यावेळी कुलाबावरून ताडदेवसाठी बस पकडली असताना त्याची बॅग चोरीला गेली. याबाबत त्याने कुलाबा आणि मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

CID मालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची बॅग बसमधून लंपास; पैसे, कागदपत्रं चोरीला
अभिनेत्याची बॅग चोरीलाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 4:47 PM

‘सीआयडी’ (CID) या लोकप्रिय मालिकेत इन्स्पेक्टर सचिनची भूमिका साकारणारा अभिनेता हृषिकेश पांडे (Hrishikesh Pandey) याची बॅग चोरीला (Robbed) गेली. हृषिकेश त्याच्या कुटुंबीयांसोबत मुंबईत एसी-बसमध्ये फिरत असताना ही घटना घडली. त्याच्या बॅगेत असलेले पैसे आणि काही कागदपत्रं चोरीला गेली आहेत. 5 जून रोजी ही घटना घडली. कुटुंबीयांसोबत एलिफंटा केव्सला भेट देण्यासाठी जाताना ही घटना घडल्याचं त्याने सांगितलं. त्यावेळी कुलाबावरून ताडदेवसाठी बस पकडली असताना त्याची बॅग चोरीला गेली. याबाबत त्याने कुलाबा आणि मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं, “संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आम्ही एसी बसमध्ये चढलो. बसमधून उतरल्यावर माझ्या लक्षात आलं की माझी बॅग चोरीला गेली. त्यात पैसे, क्रेडिट कार्ड्स, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर काही महत्त्वाची कागदपत्रं होती. याबद्दल मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.”

हे सुद्धा वाचा

मालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका साकारणाऱ्या हृषिकेशलाच चोरीच्या घटनेला सामोरं जावं लागल्याने तो पुढे म्हणाला, “मी मालिकेत सीआयडी इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती आणि आता लोक आमच्याकडे त्यांचे केसेस घेऊन यायचे. त्यामुळे हा एक विनोदच झाला आहे. खऱ्या आयुष्यातही अनेकजण माझ्याकडे मदत मागायला यायचे. आता माझ्यासोबतच चोरीची घडना घडल्याने पोलिसांना चोराचा शोध लवकराच लवकर लागू दे अशी मी अपेक्षा करतो.”

सीआयडी मालिकेतील कलाकारांची ग्रेट-भेट

काही दिवसांपूर्वीच सीआयडी मालिकेतील कलाकार यांनी एकमेकांची भेट घेतली होती. दयानंद शेट्टी (इन्स्पेक्टर दया), आदित्य श्रीवास्तव (इन्स्पेक्टर अभिजीत), दिनेश फडणीस (इन्स्पेक्टर फ्रेडरिक), श्रद्धा मुसळे (डॉ. तारिका), जान्हवी छेडा (इन्स्पेक्टर श्रेया), अजय नागरथ (सब इन्स्पेक्टक पंकज) हे कलाकार भेटले होते. या भेटीचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.